मुंबई (प्रतिनिधी) : कोस्टल कोकण हे मॅगझिन जगभरात पोहोचावे. चित्रपटसृष्टीने कोकणात यावे जेणेकरून पर्यटनसंधी बरोबरच येथील अनोळखी स्थळे लोकांपर्यंत पोहोचून कोकणातील लोकांना जास्तीत जास्त रोजगाराबरोबरच यशही मिळेल असे प्रतिपादन भाजप आमदार नितेश राणे यांनी केले.
कोस्टल कोकण या मॅगझिनचा प्रकाशन सोहळा शनिवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहात पार पडला. यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते. कोकणातील प्रवास, खाद्य संस्कृती आणि उद्योजकता इंग्रजी भाषेतून कोस्टल कोकण या संस्थेने मॅगझीनच्या रूपात शनिवारी प्रकाशित करण्यात आले. यातून कोकणची माहिती आपल्या भाषेतून आपल्या माणसांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश असून कोकणाबाहेरील इतर भाषिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी कोकणात यावे आणि कोकणातील रोजगार, उद्योग वाढावेत याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मॅगझीनच्या उद्घाटनासाठी आमदार नितेश राणे, अभिनेते संदीप कुलकर्णी, अशोकराव दुगाडे, अनंत भालेखन आणि कार्यक्रमाचे आयोजक प्रदीप मांजरेकर व रचना अमित लचके-बागवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोकणच्या विकासासाठी झटनाऱ्या युट्यूबर्स आणि उद्योजकांना कोकण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोकण डिजिटली लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या यु ट्युबर्स अन् उद्योजकांचा परिसंवाद या कार्यक्रमात घेण्यात आला.
यावेळी अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी श्वास चित्रपटाच्या शूटींग मागचे कारण कोकणच्या निसर्ग सौंदर्यासाठी किती समर्पक होते, हे उपस्थितांना सांगितले अन् जास्तीत जास्त चित्रपट कोकणात घडावेत, अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाला मुंबई, ठाणे, नवी मुंबई बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातून उद्योजक व कोकण चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण खोत यांनी केले.
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…
मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…