Friday, December 13, 2024
Homeक्रीडा२३व्या षटकानंतर शेन वॉर्नला २३ सेकंदांची श्रद्धाजंली

२३व्या षटकानंतर शेन वॉर्नला २३ सेकंदांची श्रद्धाजंली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला कालपासून सुरुवात झाली आहे. लॉर्ड्स स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज व फिरकी गोलदांजीचा खऱ्या अर्थाने जादूगर असलेल्या शेन वार्नला अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहली.

दरम्यान, न्यूझीलंडच्या डावातील २३ षटक संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंसह स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी २३ सेकंदांसाठी शेन वार्नला श्रद्धांजली वाहली. शेन वार्नला श्रद्धांजली वाहलेला व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये न्यूझीलंडच्या डावातील २३३ षटक संपल्यानंतर शेन वॉर्नला मैदानावरील स्क्रीनवर दाखवण्यात आले.

त्यावेळी खेळाडू, पंच आणि स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभं राहून वॉर्नच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवल्या आणि २३ सेकंदांसाठी त्याला श्रद्धांजली वाहली. क्रिकेटविश्वात अशा प्रकारे श्रद्धांजली वाहण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. या वर्षी ४ मार्च २०२२ रोजी शेन वॉर्नचा थायलंडमध्ये मृत्यू झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -