डोंबिवलीत नालेसफाई झालीच नाही

डोंबिवली (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत ३१ मेपर्यंत ८० टक्के नाले साफ करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात ५० टक्के नाफेसफाई झाली नसल्याचे चित्र दिसत आहे. डोंबिवलीकरांनी याबाबत पालिका प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. पालिका आयुक्तांनी डोंबिवलीतील नाल्यांची पाहणी करून सत्य परिस्थिती पाहावी अशी मागणी काही डोंबिबलीकर करीत आहेत.


डोंबिवलीतील अनेक मोठ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, कागद आणि कचरा साठल्याचे दिसून येत आहे. मोठे नाले पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर साफ करण्याचे निर्देश दिले असतानाही त्याउलट नालेसफाई झालीच नसल्याची पोलखोल नागरिकांनी केली आहे. हवामान खात्याने यावर्षी १०३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जिह्यात ६० टक्के पाऊस पडला तरी पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे सिद्ध झाले असून त्यासाठी नालेसफाई न होणे हेच कारण असल्याचे मनीषा राणे यांनी सांगितले.


पालिका हद्दीतील मोठे नाले कर्मचारी वर्गाकडून तर छोटे नाले ठेकेदार पद्धतीने साफ केले जातात. त्यात साडेतीन कोटी पालिका तिजोरीतून खर्च होत आहेत. मात्र करदात्यांचा पैसा वाया जात असून नालेसफाई होत नसेल तर प्रशासनाला हा पैसा नाल्यात कुठे वाहत गेला याचे उत्तर द्यावे लागेल असे राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या