रांची (वृत्तसंस्था) : नुकत्याच संपलेल्या ‘आयपीएल’च्या हंगामात चेन्नईची कामगिरी विशेष नव्हती, पण या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा मात्र कायम चर्चेत राहिला आहे. रांची विमानतळावर धोनीने एका दिव्यांग चाहतीसोबत काही वेळ घालवला आणि तिला आयुष्यातील एक खास क्षण भेट म्हणून दिला. धोनीची फॅन असलेल्या लावण्याने आता तिचा फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आणि सांगितले की, या भेटीदरम्यान ती खूप भावूक झाली होती.
तेव्हा धोनीने स्वतः तिचे अश्रू पुसले आणि सांगीतले यापुढे कधीही रडू नकोस’. ‘धोनी खूप गोड आहे व त्याला भेटणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात अद्भुत अनुभव आहे’, असे ती म्हणाली. धोनीसोबतच्या भेटीत लावण्या खूपच आनंदी दिसत होती.
लावण्याच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, ३१ मे रोजी रांची विमानतळावर ती धोनीला भेटली होती. यादरम्यान तिने धोनीला तिचे स्केचही भेट दिले. लावण्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले ‘धोनीसोबतच्या माझ्या भेटीचे वर्णन मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.’
लावण्याची इच्छा झाली पूर्ण…
जयपूर येथे राहणारी लावण्या पिलानिया ही स्पाइन मस्कुलर ॲट्रोफी या असाध्य आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे लावण्या दुसऱ्या माणसाच्या मदतीशिवाय काहीही करू शकत नाही. तर या असाध्य आजारामुळे तिची हाडेही दिवसेंदिवस कमकुवत होत आहेत. त्यामुळे ती रोज जीवन-मरणाची लढाई लढत आहे. नुकतेच लावण्याने सोशल मीडियावर महेंद्रसिंग धोनीला भेटण्याची विनंती केली होती.
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…