आपत्कालीन दुर्घटनांसाठी सिडको नियंत्रण कक्ष सज्ज

Share

नवी मुंबई (वार्ताहर) : सिडको महामंडळाचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष १ जून ते ३० सप्टेंबर या पावसाळी कालावधीमध्ये दिवसरात्र २४ कार्यरत राहणार आहे. दरवर्षी पावसाळी कालावधीमध्ये सिडकोतर्फे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्ती, दुर्घटना लक्षात घेता जून ते सप्टेंबर या कालावधीत सिडकोचा सुसज्ज असा आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत असतो.

सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन इमारतीच्या तळमजल्यावरील हा नियंत्रण कक्ष कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही २४ तास कार्यरत राहणार आहे. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी, आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा, उद्यान विभाग आदी महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी २४ तास संपर्कात असतील.

सिडकोच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाद्वारे वृक्षांची पडझड, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी, रस्त्यावरील उघड्या गटारांची झाकणे पूर्ववत बसवणे, पूरसदृश परिस्थिती, रस्त्यांवरील खड्डे, रस्ते वा नाल्याजवळ साचलेला कचरा, व्यक्तींचे पाणीसाठ्याच्या ठिकाणी बुडणे, आग व आगीचे विविध प्रकार, साथीचे रोग, विषारी प्राणी चावण्यासंबंधी बाबी, इमारत कोसळणे, भूस्खलन, पाणी साचणे या आपत्तींची दखल घेण्यात येऊन त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येईल.

नागरिकांनी वरीलपैकी कोणतीही आपत्ती उद्भवल्यास पुढे देण्यात आलेल्या दूरध्वनी अथवा व्हॉटसॲप क्रमांकावर किंवा ई-मेलद्वारे सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून आपत्तीसंबंधी माहिती द्यावी.

१. दूरध्वनी क्र. ०२२-६७९१ ८३८३/८३८५, २७५६२९९९ २. टोल फ्री क्र. १८००२२६७९१ ३. व्हॉटसॲप क्र. ८८७९४५०४५० ४. फॅक्स क्र. ०२२-६७९१८१९९ ५. ई-मेल eoc@cidcoindia.com

पनवेल महानगरपालिकेला हस्तातंरित केलेल्या क्षेत्रासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक : १. दूरध्वनी क्र. ०२२-२७४६१५००/२७४५८०४०/४१/४२ २. टोल फ्री क्र. १८००२७७०१ ३. व्हॉटसअॅप क्र. ९७६९०१२०१२

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

28 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

28 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

36 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

39 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

48 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

51 minutes ago