नागपूर : नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सुरेश भट सभागृहात ५२ प्रभागांतील महिलांच्या अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत काढली.
२०११ च्या लोकसंख्येनुसार प्रभागांमधील अनुसूचित जाती, जमातींची संख्येच्या आधारावर आरक्षण काढण्यात आले. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असून यातून अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण काढण्यात आले.
तीन सदस्यीय प्रभागात १६ प्रभागात प्रत्येकी एक जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित निघाली. सहा जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले. ५६ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या.