Tuesday, December 10, 2024
Homeमहत्वाची बातमीपुतीन ठणठणीत, रशियाचा दावा

पुतीन ठणठणीत, रशियाचा दावा

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाल्याचा दावा ब्रिटनच्या एमआय ६ या गुप्तचर संघटनेने केला होता. आता हा दावा रशियाने फेटाळून लावला आहे. पुतीन आजारी आहेत, या बातमीत तथ्य नाही. पुतीन यांच्यावरील अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे रशियाचे संरक्षणमंत्री सेर्गेई लावरोव यांनी म्हटले आहे.

पुतीन विविध प्रसंगी भाषणे करतात. त्यांना भाषण करताना कोणीही टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो. अफवांवर किती विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवावे, असे लावरोव यांनी सांगितले. व्लादिमीर पुतीन हे सोमवारी व्हिडीओ कान्फरन्सद्वारे सहका-यांशी संवाद साधत असताना, त्यांचे काढलेले छायाचित्र सोशन मीडियावर झळकले. पुतीन यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे, या छायाचित्रातून रशियाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, रशियाने युक्रेनमधील सिव्हिएरोडोनेत्स्क या शहराच्या परिसरात प्रवेश केला आहे. त्या शहराला वेढा घालण्याच्या दृष्टीने रशियाने हालचाली सुरु केल्या आहेत. या शहरात युक्रेन व रशियाच्या फौजांमध्ये तुंबळ युद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -