प्रधानमंत्री यांनी साधला देशातील अनाथ बालकांशी संवाद

पालघर (प्रतिनिधी) : पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत महत्त्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील अनाथ बालके यावेळी उपस्थित होते. त्यांना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.


तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जा. योगासनांना आपल्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान द्या, असा संदेश पंतप्रधानांनी यावेळी बालकांना उद्देशून दिला.


जिल्हाधिकारी श्री. गुरसळ यांनी यावेळी बालकांना जिल्हा प्रशासन शिक्षणात खंड पडू देणार नाही असा धीर देत चांगला अभ्यास करा आणि उत्तम भविष्य निर्माण करा, असा सल्ला दिला. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद होत्या. मात्र शिक्षण ऑनलाइन सुरू होते आता जूनपासून नविन शैक्षणीक वर्ष सुरू होईल आणि शाळाही प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत.


त्यामुळे चांगले नागरिक बनण्यासाठी शिक्षणाची कास धरा. समाज आपल्यासोबत आहे. तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी बालकांना धीर देताना सांगितले.

Comments
Add Comment

विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

विरार : विरार पश्चिमेच्या ओलांडा परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून

जिल्ह्यातील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर

पालघर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन

वसई-विरार पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

विरार (प्रतिनिधी): वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रारूप

विरार-सफाळे जलमार्गावर बोट फेऱ्या वाढणार

बंदरे विकास मंत्री नितेश राणेंचे निर्देश विरार (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीतून

वसईत गॅस पाईपलाईन फुटली

वसई : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वसंत नागरी परिसरात शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली.

शहरातील पंधराशे दुर्गामूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या