पुणे (हिं.स.) पुण्यात प्रथमच ओमायक्रॉन या कोरोना विषाणुचा उपप्रकार असलेल्या बी ए.४ चे चार आणि बीए. ५ या व्हेरिएंटचे तीन असे सात रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांपैकी ४ पुरुष तर ३ महिला रुग्ण होते. मात्र या सातही रुग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून नागरीकांची चाचणी घेण्याचे प्रमाण वाढवण्यात आल्याचे सांगत नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे, असे आवाहन टोपे यांनी केले.
ज्या नागरिकांचे दोन डोस झालेले नाही त्यांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे, तसेच बूस्टर डोस घ्यावा, सध्या राज्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी मास्क बंधनकारक करणे गरजेचे नसल्याचेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.