नवी दिल्ली (हिं.स) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार ३० मे रोजी सकाळी १०:३० वाजता डिजिटल पद्धतीने पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत लाभ जारी करतील. शाळेत जाणाऱ्या मुलांना पंतप्रधान शिष्यवृत्ती रक्कम हस्तांतरित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान मुलांसाठी पीएम केअर्सचे पासबुक आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य कार्ड मुलांना वितरित केले जाईल.
११ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत कोविड-१९ महामारीमुळे दोन्ही पालक किंवा कायदेशीर पालक/दत्तक पालक गमावलेल्या मुलांना आधार देण्यासाठी पंतप्रधानांनी २९ मे २०२१ रोजी पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना सुरू केली होती.
मुलांची सर्वसमावेशक काळजी आणि संरक्षण यासाठी शाश्वत पध्दतीने त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणे, शिक्षण आणि शिष्यवृत्तीद्वारे त्यांना सक्षम बनवणे, वयाची २३ वर्षे पूर्ण झाल्यावर १० लाख रुपये आर्थिक सहाय्य पुरवून स्वयंपूर्ण अस्तित्वासाठी सुसज्ज बनवणे आणि आरोग्य विम्याद्वारे त्यांचे निरामय आरोग्य सुनिश्चित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
मुलांची नोंदणी करण्यासाठी pmcaresforchildren.in हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पोर्टल ही सिंगल विंडो प्रणाली आहे जी मुलांसाठी मान्यता प्रक्रिया आणि इतर सर्व सहाय्य सुलभ करते.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…