उन्हाळ्यात बियरच्या मागणीत वाढ; बियर पिण्यात कॉलेज तरुणाई अग्रेसर

नाशिक : कडक उन्हाळा म्हटले की कोणी शीतपेयाचा आनंद घेतात तर कोणी थंडी थंडी बियरचा. विशेष म्हणजे उन्हाळ्यात बियरच्या मागणीत अचानक वाढ होत असल्याचे बघायला मिळत असून कॉलेजची तरुणाई बियरकडे सर्वाधिक आकर्षित होत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पाहणीत समोर आले आहे.


यंदाच्या उन्हाळ्यात वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात तर एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा हा ४५ अंशाच्याही वर जाऊन पोहोचला होता. थंडगार शहर अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये देखील एप्रिल महिन्यातच कमाल तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा आकडा पार केल्याने नाशिककर हैराण झाले होते आणि याच गर्मीत ताक, ऊसाचा रस, कोल्ड्रिंक्स खरेदी करण्याबरोबरच बियरला अधिक प्राधान्य दिल जात असल्याचे चित्र बघायला मिळाले.


नाशिक जिल्ह्यातील बियर विक्रीचा आकडा बघितला तर गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात ७ लाख ४० हजार ३१ लिटर बियरची विक्री झाली होती. मात्र यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यातील २० तारखेपर्यंतच ६ लाख ६८ हजार ३३७ हजारापर्यंत हा आकडा जाऊन पोहोचला आहे. उन्हाळ्यात बियर पिण्यास थंड वाटत असल्याने तिची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. विशेष म्हणजे एप्रिल, मे महिना हे विद्यार्थ्यांचे सुट्टीचे दिवस असल्याने या काळात पर्यटननगरी असलेल्या नाशिकमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत बियरला अधिक पसंती देतात.


यात चिंतेची बाब म्हणजे ज्या वयात महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेत मोठी स्वप्न बघायला हवीत त्याच वयातील तरुणाई बियर पिण्यात अग्रेसर असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे बियरचा अधिक खप होत असल्याने शासनाच्या महसुलात जरी वाढ होत असली तरी मात्र तरुणाईमध्ये बियरची वाढत चाललेली गोडी ही विचार करायला लावणारी आहे. कारण याच बियरचे सेवन जर अधिक प्रमाणात झाले तर हिच थंडी थंडी वाटणारी बियर अनेक आजारांना देखील निमंत्रण देऊ शकते.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : ऐन नवरात्रीत पावसाचा धुमाकूळ! महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील २४ तास...

राज्यात नवरात्रीत पावसाचा तांडव! सोलापूर : महाराष्ट्रात ऐन नवरात्रीत पावसाचा कहर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणाचा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी

नवरात्रौत्सवात झेंडूचे दर वाढले, उत्पादन घटल्याने किंमतीवर परिणाम

रायगड : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना जोरदार मागणी असून, बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात

महालक्ष्मी मंदिरात नवरात्री उत्सवासाठी भाविकांची गर्दी

कोल्हापूर: ११ दिवसांचा नवरात्रोत्सव आज 'करवीर निवासिनी' अंबाबाई, श्री महालक्ष्मी मंदिरात 'घटस्थापना'सह उत्साहात

मुंब्रामध्ये कंटेनरची दुचाकीला धडक, तीन मुलांचा जागीच मृत्यू

ठाणे : मुंब्रामध्ये भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या ३ मुलांना कंटेनरने

अतिवृष्टीमुळे संगोबा गावातील शेतीचे मोठे नुकसान – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पाहणी दौरा

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगोबा गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर