वाडा (वार्ताहर) : वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी भातबियाणे सवलतीत वाटप करण्यात आले. मात्र या वाटपावेळी कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना अनेक तास उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. वाडा पंचायत समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी भातबियाणे वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर करून बियाणे वाटपावेळी गर्दी टाळण्यासाठी अगोदर टोकन देण्याचे नियोजन केले होते.
जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे गुरुवारी प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांची नाव नोंदणी करून टोकन देण्यात आले. हे टोकन दाखवून बियाणे मिळणार होते. टोकन देण्यासाठी सकाळीच तीन टेबल लावून रांग लावणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता एकच टेबल लावल्याने लाभार्थ्यांची गर्दी झाली.
शेवटी गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले. पाच वाजेपर्यंत पंधराशेच्या वर शेतकऱ्यांना टोकन वाटप केले असून शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना आज शुक्रवारी कार्यालयातून टोकन मिळणार आहे, असे कृषी अधिकारी बी. बी. शिंदे यांनी सांगितले.
सकाळी सात वाजता येऊन रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांना बारा वाजेपर्यंत टोकन मिळाले नाही, तर अर्धा तास आधी आलेला शेतकरी टोकन घेऊन गेला. मी स्वतः चार तास रांगेत उभा होतो, तेव्हा टोकन मिळाले. – सुनील पाटील, शेतकरी
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…