उरणमध्ये स्वच्छतेचे 'तीनतेरा'


  • भररस्त्यात सुया, इंजेक्शन

  • कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी

  • याप्रकरणी अधिकाऱ्यांचे मौन


उरण (वार्ताहर) : उरण नगरपालिकेच्यावतीने स्वच्छ उरण, सुदंर उरण करण्यासाठी अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात येत आहे. हा सर्व खटाटोप सुरू असताना ज्याठिकाणी कचरा टाकू नये असा बोर्ड लावला आहे त्याच ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकून स्वच्छ उरण, सुंदर उरणच्या संकल्पाला हरताळ फासले आहे.


पॅथॉलॉजीमधील कचरा भररस्त्यात टाकला जात आहे. याकडे लक्ष देण्यास पालिकेच्या आरोग्य विभागाला वेळ नाही. उरण शहरातील आरोग्य विभागाची ज्यांच्याकडे जबाबदारी असे आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांच्याकडे कोणत्याही गोष्टींची माहिती विचारली असता ते सरळ सरळ मी माहिती देऊ शकत नाही, तुम्ही साहेबांना विचारा असे सांगून आपली जबाबदारी झटकतात. त्यामुळे आरोग्याची समस्या बिकट होत चालली आहे.


काही दिवसांपूर्वी दिल्लीची कमिटी शहराची पाहणी करण्यासाठी उरण शहरात आली होती. त्यावेळी राजपाल नाका येथील मुतारी आतमध्ये व्यवस्थित करून बाहेरून बाटलीच्या साह्याने कामगार पाणी सोडताना दिसत होते. कमिटी पाहणी करून गेल्यानंतर पुन्हा मुतारीची परिस्थिती जैसे थे. सध्या त्याठिकाणावरून ये-जा करताना उग्र वासाने नाक मुठीत धरून जावे लागते. उरणमधील अनेक पॅथॉलॉजीमधील सुया व इंजेक्शन भररस्त्यात टाकले जात आहे. याबाबत नगरपालिका अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता तुमचा याबाबत काहीतरी गैरसमज होत असल्याचे उत्तर देऊन वेळ मारून नेतात.

Comments
Add Comment

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या

अलिबाग पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-शेकाप लढत

१४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात अलिबाग : अलिबाग पंचायत समिती निवडणुकीसाठी १४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत.

राजिप, पंचायत समित्या निवडणुकीच्या तोंडावर पोलीस यंत्रणा सज्ज

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने

करंजाडी जिप गटात तिरंगी लढत

महाड ( वार्ताहर): महाड विधानसभा मतदारसंघ हा गेल्या ४ टर्म शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. गतवेळच्या निवडणुकीत