Wednesday, April 30, 2025

महामुंबई

शरद पवार आणि बृजभूषण सिंहांचा एकत्र फोटो; मनसेचा पवारांकडे निशाणा

शरद पवार आणि बृजभूषण सिंहांचा एकत्र फोटो; मनसेचा पवारांकडे निशाणा

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा एकत्र फोटो व्हायरल करून मनसेने शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी या दौऱ्याला विरोध केला होता.

या पाश्वभूमीवर राज ठाकरेंनी हा दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याचबाबत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत असे म्हटले होते की, माझ्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. असं असताना आता मनसेकडून आज एक नवा फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये बृजभूषण सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात एकत्र दिसत आहेत. हाच फोटो शेअर करून मनसेने पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

मनसे नेते गजानन काळे यांनी या फोटो ट्वीट केला असून यावेळी कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, "ब्रिज"चे निर्माते... सुज्ञास अधिक सांगणे न लगे... त्यामुळे राज ठाकरे यांनी जो आरोप केला होता की, महाराष्ट्रतून रसद पुरविली गेली त्याविषयी आता थेट शरद पवारांवर मनसेकडून आरोप केला जात आहे.

Comments
Add Comment