ठाण्यात ४३ मुलांच्या रक्तात आढळले हत्तीरोगाचे सूक्ष्मजीव

अतुल जाधव


ठाणे : ठाणे जिल्ह्यात ४३ लहान मुलांच्या रक्तात हत्तीरोगाचे सुक्ष्मजीव आढळून आल्याने हत्तीरोग निवारण कार्यक्रमाला हादरा बसला आहे. त्यापैकी एकट्या भिवंडी तालुक्यात २३ मुले आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेंतर्गत भिवंडी तालुक्यात बुधवार २५ मेपासून ते ५ जून या कालावधीत सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी सांगितले.


राष्ट्रीय कीटकजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम २०२२ अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची सभा उपजिल्हाधिकारी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. महेश नगरे, विभागीय अधिकारी भिवंडी-निजामपूर महानगरपालिका डॉ. प्रीया फडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सईद, ठाणे जिल्ह्याच्या हत्तीरोग अधिकारी दीपाली नासरे आदी उपस्थित होते.


औषधोपचार मोहिमेबाबत माहिती देताना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नगरे यांनी सांगितले, ऑक्टोबर २०२१ मध्ये सहा ते सात वर्षं वयोगटातील निवडक मुलांची तपासणी करण्यात आली. त्यात ठाणे जिल्ह्यातील ४३ लहान मुलांच्या रक्तात हत्तीरोगाचे सुक्ष्मजीव आढळले असून त्यात भिवंडी तालुक्यातील सर्वाधिक २३ बालके आहेत. त्या आनुषंगाने ठाणे येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्रात दि. २० मे रोजी भिवंडी तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. बालकांना हत्तीरोग मुक्त ठेवण्यासाठी मुले, प्रौढ व्यक्ती व वयोवृद्ध या सर्वांनी हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे सेवन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भिवंडीमध्ये प्रादुर्भाव अधिक असल्याने या तालुक्यात पुढील दोन वर्षं सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


हत्तीरोग हा क्युलेक्स प्रजातीच्या डासांमार्फत होतो. सेप्टिक टँक, घाण/निचऱ्याच्या जागी व गटारे अशा दुषित पाण्याच्या जागी या डासांची पैदास होते.

Comments
Add Comment

कल्याण - डोंबिवलीत मतदानापूर्वीच कमळ फुललं: भाजपाची विजयाची हॅट्रिक

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असली, तरी मतदानापूर्वीच भाजपाला मोठे यश

ठाण्यात गावदेवी मातेचा पालखी सोहळा

ठाणे : ठाणे पूर्व भागातील आई चिखलादेवी (गावदेवी) मातेचा पालखी सोहळा पौष पौर्णिमेमध्ये दिनांक ०२ जानेवारी २०२६

मीरा–भाईंदर महापालिका निवडणूक

युतीसाठी शिवसेनेकडून २४ तासांचा अल्टिमेटम भाईंदर : मीरा–भाईंदर महापालिका निवडणूक युतीसंदर्भात शिवसेना आणि

ठाण्यात घराणेशाहीचा वाद चिघळला

खा. नरेश म्हस्केंच्या मुलाच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर

कडोंमपा निवडणुकीसाठी महायुतीत धुसफूस

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत विसंवाद उघडकीस

अवयवदानातून मिळाले ६ रुग्णांना जीवदान

ठाणे : ब्रेन डेड घोषित झालेल्या ३८ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे एकाच वेळी सहा रुग्णांना नवे आयुष्य मिळाले आहे.