माथेरानमध्ये अश्वपाल संघटनेचे आंदोलन


  • पेव्हर ब्लॉकमुळे घोड्यांना अपघात

  • अपघाताची जबाबदारी कोण घेणार


नेरळ (वार्ताहर) : माथेरानमध्ये वाहनांना ब्रिटिश काळापासून बंदी आहे, असे असताना माथेरानमध्ये पर्यटनासाठी असलेले एकमेव वाहन म्हणून घोडे यांचा वापर होतो. मात्र माथेरानच्या रस्त्यावर बसविण्यात आलेल्या क्ले पेव्हर ब्लॉकमुळे घोड्यांचे पाय घसरून अपघात होत आहेत. दरम्यान, माथेरानच्या रस्त्यावर अनेक चढ-उतारा ठिकाणी बसविण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक काढण्यात यावेत, अशी मागणी अश्वपाल संघटनेने केली आहे. त्यामुळे आजपासून घोडे पर्यटकांच्या दिमतीला असणार नाहीत, असे जाहीर केले आहे.


माथेरानमध्ये वाहनबंदी असल्याने हे प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ आहे. मोटारवाहनाला बंदी असल्याने येथे प्रवासाकरता घोडे हा प्रमुख पर्याय दिला आहे. मात्र या घोडा वाहनावर संकट ओढवण्याची शक्यता लक्षात घेता चढ-उतारावर लावलेले पेव्हर ब्लॉक प्रशासनाला वारंवार लेखी निवेदन काढण्याची मागणी केली होती. माथेरानच्या दस्तुरी या प्रवेशद्वार असलेल्या महात्मा गांधी रस्त्यावर एमएमआरडीएकडून पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू आहे. त्यातील पिसारनाथ मार्केटला बसवलेले क्ले पेव्हर ब्लॉक व दस्तुरी ते सखाराम तुकाराम पॉईंट येथे लावलेले क्ले पेव्हर ब्लॉक यामध्ये फरक आहे.


पिसारनाथ मार्केटमध्ये बसवलेल्या क्ले-पेव्हर ब्लॉकवर आमचे घोडे घसरत नाहीत पण एम. जी. रोडला बसवलेले क्ले पेव्हर ब्लॉक संशयाच्या भोवऱ्यात आहेत. ब्लॉकवरून घसरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. एक घोडेवालासुद्धा या उतार जागेवर घोड्यासह पडून जखमी झाला. अश्वपाल संघटनेच्या पदाधिकारी आणि मूळवासीयांनी पेव्हर ब्लॉक काढण्याचा तक्रारी अर्ज पालिकेकडे केला आहे.


तीव्र उतारावरील धोकादायक क्ले पेव्हर ब्लॉक काढले नाहीत तर एकही घोडा रस्त्यावर येणार नाही आणि त्यामुळे पर्यटकांचे नुकसान होणार आहे. प्रशासनाने कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने अखेर २३ मे पासून घोडेबंद आंदोलन सुरु झाले आहे. सातत्याने येथे वापरण्यात येणाऱ्या पेव्हर ब्लॉकविषयी अश्वचालकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. चढउतारांच्या रस्त्यांवर पर्यटक बसवून घेऊ जाणे दिवसेंदिवस कठीण होत चालले असून घोडा घसरल्यास अपघाताची जबाबदारी कोण घेणार, घोड्यांना इजा झाल्यास त्यास कोण जबाबदार असणार असा प्रश्न अश्वचालक विचारत आहेत. त्याबाबतचे लेखी निवेदन एमएमआरडीएचे विजय पाटील यांना देण्यात आले आहे.


आंदोलनात माथेरानमध्ये पर्यटकांची सुविधा देण्यासाठी मंजुरी असलेली ४५० घोडे तर मालवाहतूक करणारे ४०० घोडे यांनी घोडे बंद आंदोलनात सहभाग घेतला आहे. स्थानिक अश्वपाल संघटना अध्यक्षा आशाताई कदम आणि मूळ निवासी अश्वपाल संघटनेचे रामा आखाडे यांनी निवेदन पोलिसांना दिले आहे.

Comments
Add Comment

पनवेल महापालिकेचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात

पनवेल : पनवेल महापालिकेने ९ वर्षामध्ये देशपातळीवरती विविध सन्मान प्राप्त केले. महापालिकेची वास्तू जशी आयकॉनीक

मुंबई-काशिद रो-रो सेवा रखडली

वादळ, वारे, उसळणाऱ्या लाटांमुळे कामात अडथळा नांदगाव मुरुड : मुंबई-काशिद रो-रो सेवेचे गेल्या पाच वर्षांपासून संथ

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,