Friday, December 13, 2024
Homeमहामुंबईमध्य रेल्वेतील घाट विभागांचे मान्सून निरीक्षण

मध्य रेल्वेतील घाट विभागांचे मान्सून निरीक्षण

महाव्यवस्थापकांनी घेतला कल्याण- लोणावळा विभागातील खबरदारीचा आढावा

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी पावसाळ्यात उपनगरी आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या सुरळीत आणि विनाव्यत्यय सेवा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेने मान्सूनची तयारी सुरू केली आहे. मान्सूनचा सामना करण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांपैकी दक्षिण-पूर्वेकडील घाट विभाग म्हणजेच कर्जत-लोणावळा विभाग आणि ईशान्येकडील म्हणजे कसारा-इगतपुरी विभागात विशेष भर देण्यात येत आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी कल्याण- लोणावळा विभागाची पाहणी केली आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व खबरदारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून रेल्वे सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय धावतील. त्यांनी घाट विभागातील मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला आणि सांगितले की, रेल्वेचा घाट विभाग अनपेक्षित दरड कोसळण्याच्या आणि लँडस्लाइडच्या घटनांमुळे असुरक्षित आहे. ज्यामुळे सेवा विस्कळीत होऊ शकतात. कोणत्याही अत्यावश्यक परिस्थितीत, ही तत्परता भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन लवकरात लवकर केलेले उपाय वाहतूक पूर्ववत करण्यास मदत करेल.

अशा कोणत्याही घटना रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने दरवर्षीप्रमाणेच लँडस्लाइड होण्याच्या असुरक्षित ठिकाणी एकूण १४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आखली आहे. यापैकी ८७ सीसीटीव्ही कॅमेरे दक्षिण- पूर्व म्हणजे कर्जत-लोणावळा विभागातील १९ असुरक्षित ठिकाणी तर ५८ सीसीटीव्ही कॅमेरे ईशान्येकडील म्हणजे कसारा-इगतपुरी विभागात ११ संवेदनशील ठिकाणी बसवण्यात येणार आहेत.

समर्पित आणि कार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या टीमद्वारे या सीसीटीव्हीचे २४x७ निरीक्षण केले जाईल. हे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. या शिवाय घाट विभागात ५९४ नग बोल्डरचे स्कॅनिंग आणि ड्रॉपिंगचे काम हाती घेण्यात आले असून, लवकरच हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -