अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट

जम्मू : आगामी ३० जून पासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर लश्कर-ए-तोयबाशी संबंधीत ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ (टीआरएफ) या जिहादी दहशतवादी संघटनेने धमकीचे पत्र जारी केलेय. यात टीआरएफने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केलीय.


या पत्रात टीआरएफने म्हटले आहे की, आम्ही अमरनाथ यात्रेच्याविरोधात नाही. काश्मीरमध्ये येणाऱ्या भाविकांच्याही विरोधात नाही. मात्र, अमरनाथ यात्रेचा वापर हा केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या राजकारणासाठी करणार असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. अमरनाथ यात्रेसाठी १५ हजार ते ८ लाख यात्रेकरूंची नोंदणी ही १५ दिवसांपासून ते ८० दिवसांपर्यंत करण्यात येत आहे. याद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्वयंसेवकांना काश्मीरमधील परिस्थिती चिघळवण्यासाठी पाठवत असल्याचा दावा या दहशतवादी संघटनेने केला आहे. आम्ही कोणत्याही धार्मिक यात्रेच्या विरोधात नाही. मात्र, धार्मिक यात्रांचा वापर काश्मीरमधील संघर्षाविरोधात होत असेल तर आम्ही त्याच्या विरोधात आहोत, असे टीआरएफने धमकावले आहे. अमरनाथ यात्रेसाठी येणारे भाविक सुरक्षित राहतील. मात्र, त्यांनी संघाच्या लोकांना मदत, आश्रय देऊ नये. अन्यथा गंभीर परिणाम होतील अशीही धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे.


जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमरनाथ यात्रेशी संबंधित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत दिली आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधा आणि योग्य तयारी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रा ३० जूनपासून पहलगाम आणि बालटाल या दोन मार्गांपासून सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील