नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. हार्दिक पंड्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
या संघाचे नेतृत्व लोकेश राहुलकडे सोपविण्यात आले आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या संघात परतला आहे. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांना टीम इंडियाच्या टी-२० संघात पहिल्यांदाच संधी मिळाली असून विराट, रोहित, बुमरासारखे दिग्गज खेळाडू विश्रांतीवर असतील.
लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक अशा संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. ९ जूनपासून या मालिकेला सुरुवात होईल.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…