आसाममध्ये ७ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका

गुवाहाटी : आसाममध्ये आलेल्या भयानक पुराचा फटका राज्यातल्या २२ जिल्ह्यांमधीलल ७ लाखाहून अधिक नागरिकांना बसला आहे. या पुरामुळे रविवारी दोन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत पूर आणि भूस्खलनात एकूण २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनिक पूर अहवालानुसार, नागाव जिल्ह्यातील कांपूर महसूल क्षेत्रात चार लोक पाण्यात बुडाले आहेत. पुरामुळे होजई जिल्ह्यातील दुबोका येथे एका व्यक्तीचा आणि कचार जिल्ह्यातील सिलचरमध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. आसाममध्ये यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 24 झाल्याचे प्राधिकरणाने सांगितले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 7 लाख 19 हजार 540 लोक बाधित झाले आहेत. नागाव जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला असून तेथील 3.46 लाख लोक संकटात आहेत. यानंतर कचरमध्ये 2.29 लाख आणि होजईमध्ये 58 हजारांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील 269 छावण्यांमध्ये 91 हजार 518 बाधित लोक राहत आहेत. प्रशासनाने 152 मदत वितरण केंद्रेही स्थापन केली आहेत. आत्तापर्यंत भारतीय लष्कर, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि स्वयंसेवकांच्या मदतीने एकूण 26 हजार 236 अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली आहे.


आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे मदतकार्य सुरुच आहे. भारतीय हवाई दलाने दोन एमआय-17 हेलिकॉप्टर, एक चिनूक हेलिकॉप्टर आणि एक एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर आपल्या एएन-32 विमानांसह मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात केले आहेत. पुराच्या काळात 15 मे पासून आतापर्यंत हवाई दलाने 454 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या लोकांमध्ये 119 प्रवाशांचाही समावेश आहे. हे प्रवासी दामी हासाओ जिल्ह्यातील डितोकचारा रेल्वे स्टेशनवर अडकले होते. हवाई दलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरने रेल्वे ट्रॅकवर लँडिंग करत या लोकांची सुटका केली होती.

Comments
Add Comment

Maharashtra Sadan : 'दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा'

नवी दिल्ली : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान नवीन व जुने

Heatwave : उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन

नवी दिल्ली : दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या

Thalapathy vijay meets pm narendra modi : CM थलपती विजय यांनी घेतली PM मोदींची भेट! २५ मिनिटांच्या चर्चेने वाढवले राजकीय तापमान!

नवी दिल्ली : तामिळनाडूचे (Tamilnadu Minister) नवनियुक्त मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते जोसेफ विजय (थलपती विजय) (Vijay Joseph) हे

AMCA stealth fighter : संरक्षण क्षेत्रात क्रांती! भारताच्या पहिल्या स्टेल्थ फायटर 'AMCA' साठी १५,००० कोटींची शर्यत सुरू; ३ बड्या कंपन्या शॉर्टलिस्ट!

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेची ताकद अनेक पटींनी वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) आज एक ऐतिहासिक पाऊल

जलजीवन मिशनच्या ५१ हजार योजनांचा आढावा; नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य देणार

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या उपस्थितीत जलजीवन मिशनमधील योजनांचा दिल्लीत आढावा मुख्यमंत्री देवेंद्र

Keralam : माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या घरावर ED चे छापे; केरळमधील थरारक व्हिडिओमुळे देशात खळबळ!

तिरुवनंतपुरम : केरळच्या राजधानीत आज अत्यंत तणावाचे आणि हिंसक वातावरण पाहायला मिळाले. कोचीन मिनरल्स अँड रुटाईल