"यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात"

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील भीषण पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या औरंगाबादकरांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपने आयोजित केलेल्या जल आक्रोश मोर्चात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सभेला संबोधित करताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री घरातून कामं करतात, अशी टीका दानवेंनी केली. ते म्हणाले की, हे सरकार जेलमधून आणि घरातून काम करेत. यांचे दोन मंत्री जेलात आणि मुख्यमंत्री घरात आहेत. कोरोना काळात आमच्या पक्षाचे आमदार-खासदार बाहेर फिरले पण मुख्यमंत्री बाहेर पडले नाहीत. कोरोना काळात त्यांनी काय घोषणा दिली? माझं कुंटूंब माझी जबाबदारी. पण, तुम्ही जबाबदारी स्विकारली नाही. आमचे लोक जनतेत गेले. तेव्हा फडणवीस म्हणाले होते, मुख्यमंत्री घरात आणि आम्ही तुमच्या दारात. त्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले."


"मुख्यमंत्री सोलापूरला गेले, त्यांना शेतकरी म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अतिवृष्टी झाली, त्याची मदत मंजूर झालीये पण अजून मिळाली नाही. आम्हाला मदत करा. तर, मुख्यमंत्री म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी. त्यानंतर मुख्यमंत्री उस्मानाबादला गेले, तिथे हॉटेलवाले भेटले, ते म्हणाले, कोरोना काळात कर्ज काढलं, कोरोना आला आणि पैसे बुडाले. केंद्राने पॅकेज दिलं, तुम्ही आम्हाला मदत करा. हे सगळीकडे गेले आणि म्हणाले माझं कुटुंब माझी जबाबदारी. आरे पण, तु्म्ही जबाबदारीपासून पळ काढला," अशी टीकाही दानवेंनी केली.


दानवे पुढे म्हणाले, "कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केली. लोकांना मोफत लस दिली, मोफत राशन दिलं, पण राज्याने काहीच दिलं नाही. आता आमची जनतेकडून एकच अपेक्षा आहे, जनतेनं यांना अद्दल घडवावी. हा मोर्चा फक्त भाजपचा नाही, आम्ही लोकांचा आवाज ऐकला आणि तो आवाज सरकारपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही विरोधीपक्ष म्हणून आमचं काम करतो. तुम्ही आज आमची हाक ऐका. सरकारने जनतेचं ऐकावं, नाहीतर ही जनता तुमच्या कानशिलात लगावल्याशिवाय राहणार नाही," असेही दानवे म्हणाले.

Comments
Add Comment

Shivneri ST Bus : एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या

Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी

Maharashtra Government Veterinary Health System : राज्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडणार? ६,५०० कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात!

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

Todays Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; ग्राहकांमध्ये संभ्रम, जाणून घ्या आजचे (४ मार्च) ताजे दर!

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार पाहायला

Heat alert : हवामानाचा लपंडाव : अयोध्येत हुडहुडी तर अकोल्यात लाहीलाही! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट, दुपारनंतर...

महाराष्ट्रातील हवामानात सध्या कमालीची अनिश्चितता पाहायला मिळत आहे. अवघ्या आठवड्याभरापूर्वी ज्या राज्यात

कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे.