जनावरांचा चारा महागला; पशुपालकांसमोर आर्थिक अडचण


  • दूध व्यावसायिकांवर परिणामगवताच्या

  • लागवडीसाठी अल्पभूधारकांची कोंडी


पारस सहाणे


जव्हार : केंद्र सरकार व राज्य सरकारचे महागाईवर नियंत्रण नसल्याने सर्वसामान्य भरडले आहेतच, परंतु याचा फटका पशुपालकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सर्वत्र महागाईचा डोंब उसळला असल्याने पशुखाद्य व चाराही महागल्यामुळे पशुपालक कास्तकार, तसेच दुग्ध व्यावसायिकांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.


गाय, बैल, म्हशी या शेतीवर राबणाऱ्या तसेच दूध देणाऱ्या पशूंना आरोग्यदायी व सुदृढ ठेवण्याकरिता हिरव्या चाऱ्यासह सरकी, तुरीचा कोंडा, गव्हाचा भुसा आदी पौष्टिक वस्तू खायला देणे आवश्यक आहे. दुभत्या जनावरांना ते नित्य द्यावेच लागते. तरच दूध अधिक मिळते.


पशुखाद्यांचा भाव गेले दोन वर्षांपासून वाढले आहेत. पूर्वी एक ढेप २० रुपये किलो मिळायची. ती आता ३५ रुपये झाली आहे. तुरीचा कोंडा ९ रुपयांवरून २१ रुपये एवढा वधारला. गहू भुशाचा भावही वाढला. परंपरागत गवत महागले आहे.


गवताच्या लागवडीकरिता जमीनही भरपूर हवी. मोठ्या प्रमाणात शेतजमीन असणाऱ्यांना गजराज गवताची लागवड करणे परवडते. अल्पभूधारकाची मात्र अडचण होते. सरकी व तत्सम पशुखाद्याचे भाव दिवसेंदिवस सारखे असल्यामुळे हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र इतर पौष्टिक खाद्य विकत घ्यावेच लागते. या साऱ्या कारणांमुळे दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन कास्तकार यांचे आर्थिक बजेट बिघडत जात आहे. त्याचा परिणाम येणाऱ्या कमाईवर पडत आहे.
- रियाज शेख, दुग्ध व्यावसायिक, पोषेरा


निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेती तोट्यात आहे. दुग्धव्यवसाय कसा तरी तग धरून आहे. त्यात आता पशुखाद्य व संबंधित वस्तूंचे भाव भरमसाट वाढल्याने हा व्यवसायही अडचणीचा ठरत चालला आहे.
- आकाश शिरसाट, दुग्ध व्यावसायिक,जव्हार

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील