आमदार नितेश राणे यांचा ओरिएंटल स्कूल ऑफ मॅनेजमेंटला दणका

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई येथील ओरिएंटल स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट कॉलेजच्या मॅनेजमेंटला भाजप आमदार नितेश राणे यांनी दणका दिल्यानंतर १२० विद्यार्थ्यांना आता परीक्षेला बसण्याची मुभा प्राप्त झाली आहे.


नवी मुंबई येथील वाशी-सेक्टर १२ येथील ओरिएंटल स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट कॉलेजच्या १२० विद्यार्थ्यांना कोविडच्या कारणामुळे पूर्ण फी भरता आली नव्हती. महाराष्ट्रातील आणि कोकण-देवगड येथील हे १२० विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून वंचित राहणार होते. यामुळे त्यांचे वर्षही वाया जाणार होते. मात्र आमदार नितेश राणे यांच्या दणक्यानंतर या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी प्राप्त झाली आहे.


परीक्षेला बसण्याची परवानगी दिल्यामुळे १२० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचले आहे. कोविडच्या कारणामुळे कॉलेजची पूर्ण फी भरता आली नसल्याने अशा विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणार होते. मात्र भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने कॉलेजचे डायरेक्टर अंकूश गोयल यांनी या सर्व १२० मुलांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली.


विद्यार्थ्यांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण असून यामुळे महाराष्ट्रातील १२० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य जपले गेले आहे. आमदार नितेश राणे यांच्या मोलाच्या प्रयत्नामुळे सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Comments
Add Comment

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद

मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले.

मुंबईकरांना प्रशिक्षित करण्यासाठी अग्निशमनचा अग्निरक्षक कार्यक्रम सुरू

मुंबई : मुंबईची आपत्कालीन सज्जता आणि सार्वजनिक सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बहिणींची महाआरती

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे सोमवार ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये

वेगवान मेट्रो, पण मोबाईल बंद! अ‍ॅक्वा लाईनवर प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करणारी अ‍ॅक्वा लाईन मेट्रो (मेट्रो-३) सध्या प्रवाशांसाठी

Ameet Satam: मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणार

भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी फुंकला शंख मुंबई (विशेष प्रतिनिधी) "४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर मुंबईच्या