पुढील २५ वर्षांचे लक्ष्य ठरवण्याची हीच ती वेळ

जयपूर : "स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात देश पुढच्या २५ वर्षांचे लक्ष्य ठरवत आहेत. भाजपाचीही पुढच्या २५ वर्षांचे लक्ष्य ठरवण्याची हीच ती वेळ आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास' हाच आपला मंत्र आहे. देशातल्या लोकांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहे. देशासमोर जी आव्हाने आहेत, ती देशातल्या जनतेसोबत राहून आपल्याला परतवून लावायची आहेत," असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना केले.


जयपूरमध्ये गुरुवारपासून भाजपाची तीन दिवसीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हजेरी लावली.


जगाच्या भारताकडून खूप अपेक्षा आहेत. तसेच देशातही भाजपाबद्दल लोकांच्या मनात विशेष प्रेमाची भावना आहे. देशातली जनता भाजपाकडे विश्वासाने, अपेक्षेने पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्याला देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.


या बैठकीत यावर्षी गुजरात, हिमाचलमध्ये होणाऱ्या तसेच पुढच्या वर्षी अनेक राज्यात होणाऱ्या निवडणुका आणि २०२४ मधल्या लोकसभा निवडणुकांबद्दलची चर्चा होणार आहे. देशाच्या जनतेच्या आशा-आकांक्षांमुळे आपले दायित्व अधिक वाढले असल्याची भावनाही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा