महिलेला धक्का लागला असेल तर मी राजकारण सोडेन

मुंबई : महिलेला माझा धक्का लागला असेल तर मी राजकारण सोडेन, असे आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला दिले आहे. अटकपूर्व जामीन झाल्यावर संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी, 'आम्ही सरकारविरोधी बोलू नये, आमचे थोबाडं बंद राहावेत यासाठी आमच्यावर खोटे आरोप दाखल केल्याचा आरोप केला'.


संदीप देशपांडे यांच्यावर महिला पोलिसांना धक्का दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेच्या नंतर निर्माण झाल्याच्या तणावाच्या वातावरणात मनसे नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेताना त्यांनी महिला पोलिसांना धक्का मारल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर त्यांना आता कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.


यावेळी बोलताना त्यांनी माध्यमांचे आभार मानले आहेत. "तुम्ही दाखवलेल्या फूटेजवरून आम्ही कसलाही गुन्हा केला नाही हे स्पष्ट झाले, त्यामुळे मी तुमचे आभार मानतो." असे ते म्हणाले. "मी जर धक्का मारल्याचे तुम्ही दाखवले तर मी राजकारण सोडून देईन." असे आव्हान त्यांनी दिले आहे.


शिवसेना आणि हे सरकार सूडाचे राजकारण करत आहे हे सांगताना त्यांनी गांधीजींचे एक उदाहरण दिले. "मी घरी नसताना माझी मुले आणि बायको घरी असताना तुम्ही पोलिस पाठवता हे तुम्हाला पटते का? आज तुमचे दिवस आहेत, उद्या आमचे येतील." असे संदीप देशपांडे म्हणाले.

Comments
Add Comment

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील

BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.

शाळांमध्ये झळकणार सरकारी योजनांचे फलक; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : मुंबई विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे