कोरोनानंतर मंत्रालयात पहिल्या दिवशी २ हजार ६०० अभ्यागत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कोरोनाचे सर्व निर्बंध उठवल्यानंतर बुधवारपासून सर्वसामान्य जनतेसाठी मंत्रालयाचे दरवाजे खुले झाले. मात्र बुधवार असूनही केवळ २ हजार ६०० अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेश केल्याचे कळते. दुपारी दोननंतर सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश देणार आला. यासाठी प्रवेश पत्रिका देण्यासाठी सुमारे १० खिडक्यांची सोय करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर बुधवारपासून सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश देण्यात आला.


निर्बंधापूर्वी बुधवारी हजारोच्या संख्येने लोक मंत्रालयात आपली गाऱ्हाणी घेऊन यायचे. परंतु कोरोनानंतर मात्र, मंत्रालयाचे दरवाजे खुले झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बुधवारी लोकांकडून तसा उत्साह दिसून आला नाही. ज्येष्ठ नागरिकांना दुपारी १२ वाजल्यानंतर तर सर्वसामान्य जनतेला दुपारी २ वाजल्यानंतर प्रवेश दिला जात होता. गेल्या दोन वर्षांत मंत्रालयात केवळ अधिकारी आणि बैठकांना उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींनाच मंत्रालयात प्रवेश दिला जात होता. बुधवारपासून सर्वसामान्यांसाठी मंत्रालय खुले करण्यात आल्यामुळे मंत्री आणि सचिव दालनात गर्दी झाल्याचे चित्र होते.


कोरोनाशी मुकाबला करण्याकरीता बंद असलेला सर्वसामान्यांचा मंत्रालय प्रवेश बुधवारी तब्बल दोन वर्षांनंतर सुरू झाला. दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश देण्यात आला. दोन वर्षांपासून अभ्यागतांना प्रवेश बंद होता. प्रवेशाचा पास देण्याच्या ठिकाणी टपाल स्वीकारण्याचे काम केले जात होते. बुधवारपासून पास देण्याच्या या खिडक्यांवर पुन्हा काम सुरू झाले.

Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

खोल समुद्रातील मासेमारीसाठी १४ सहकारी संस्थांना अद्ययावत समुद्री नौका

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी वितरण मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २००

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर