सीमा दाते
मुंबई : सध्या वाढती उष्णता आणि मे महिना असल्याने मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याची चिंता आहे. मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २१.९९ टक्के इतका पाणी साठा शिल्लका आहे. हा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणीटंचाईची भीती नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सध्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे अनेक ग्रामीण भागात पाण्याची अडचणी निर्माण झाली आहे. त्यातच जमा असलेल्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवन होत असते. यामुळे मुंबईतही पाणीटंचाई होईल की काय, अशी भीती होती. मात्र आतापर्यंत मुंबईकरांना पाणीटंचाईची चिंता करण्याची गरज नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सातही तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात अनेकदा पाणीसाठा कमी शिल्लक राहिल्याने मुंबईत १० ते १५ टक्के पाणीकपात होते. मात्र या वर्षी कपातीची गरज भासणार नाही, असे दिसत आहे.
भातसा तलावात १ लाख ६१ हजार ९०० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. मध्य वैतरणा तलावातही सुमारे ८२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मोडक सागर तलावात ४३ हजार, तर तानसामध्ये २२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक असल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबई शहराला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे महिना सरासरी १ लाख १५ हजार ते १ लाख १९ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासते. तलावातील पाण्याचा साठा लक्षात घेता, हे पाणी जुलै मध्यापर्यंत पुरेल इतके आहे.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…