राज्यात वाघांची आकडेवारी दुप्पट वाढण्याचे संकेत

अमरावती (हिं.स.) : गेल्या तीन वर्षांनंतर राज्यात वाघांची ऑनलाईन प्रगणना झाली. सोमवारी बुद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी गणना आटोपली आहे. त्यामुळे राज्यात वाघांची अचूक आकडेवारी पुढे येणार आहे. प्राथमिक अहवालानुसार वाघांची संख्या दुप्पट झाल्याचे शुभसंकेत मिळत आहेत.


डेहराडून येथील वन्यजीव संस्थेच्या निर्देशानुसार, देशात एकाच वेळी वाघांची ऑनलाईन प्रगणना करण्यात आली. त्याकरिता वाईल्ड लाईफ संस्थेने एक ॲप विकसित करून दिले होते. सात दिवसांत वाघांसह अन्य वन्यजीवांच्या प्रगणनेची नोंद करण्यात आली आहे. ही प्रगणना क्षेत्रीय स्तरावर करण्यात आल्याने वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला.


राज्याच्या पाचशे वनपरिक्षेत्रात सात दिवस सतत ही मोहीम राबविण्यात आली. प्रगणनेचा ऑनलाईन डेटा डेहराडून येथे पाठविण्यात आला आहे. वाघांची रीतसर माहिती समोर आल्यानंतर वन्यजीव विभागाचे प्रमुख ती माहिती जाहीर करतील. मात्र, राज्यात वाघांची आकडेवारी पाचशेच्या वर जाण्याचे संकेत आहेत.


ताडोबा-टिपेश्वर नंबर १


वाघांच्या संख्येसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प नंबर १ वर आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य देखील वाघांच्या बाबतीत सरस ठरत आहे. कारण टिपेश्वर येथे नवतरुण वाघांची संख्या ३५ च्या आसपास गेल्याची माहिती आहे.


चंद्रपूर- ताडोबा- टिपेश्वर हा वाघांचा कॅरिडॉर झाला आहे. चंद्रपूरचे वाघ टिपेश्वरपर्यंत प्रवास करीत आहेत. ताडोबात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातसुद्धा वाघांची संख्या १५ टक्क्यांनी वाढण्याचे संकेत आहेत. पेंच, सह्याद्रीत वाघांची संख्या ५ टक्के वाढणार आहे.


दरम्यान, विदर्भात वाघांची संख्या ४०० च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. ताडोबा, टिपेश्वर, नागझिरा, नवेगाव बांध, यवतमाळ, वणी, वरोरा, उमरेड, करांडला, बुलडाणा, किनवट या भागात वाघांची संख्या २ ते १० इतकी आहे. या भागात चंद्रपूर, ताडोबा येथून वाघ येत असल्याची माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानव- वन्यजीव संघर्ष टोकाला गेला आहे.


प्रगणना आटोपली असली तरी अद्यापही अहवाल मिळाला नाही. अहवाल आल्यानंतर वन्यजीवनिहाय वर्गवारी केली जाणार आहे. त्यानंतर वाघ, बिबट आणि इतर वन्यप्राण्यांची संख्या निश्चित होईल. राज्याचे पर्यावरणीय वातावरण बघता वाघांची संख्या वाढेल, यात दुमत नाही. - सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र

Comments
Add Comment

Pune Shirur Leopard Attack : 'बिबट्या आला रे!'... आणि होत्याचं नव्हतं होता होता वाचलं! - झोक्यावर खेळणाऱ्या चिमुकल्याजवळ बिबट्या, थरार CCTV मध्ये!

पुणे : कधी काळी घनदाट जंगले आणि सुरक्षित प्राणी संग्रहालयांमध्ये पाहायला मिळणारे वन्यजीव आता थेट मानवी वस्तीत

भाजपचा मोठा गेमप्लॅन: नगराध्यक्षपदासाठी 'गुप्‍त' चाचपणी; ऐनवेळी घोषणा!

निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच नगराध्यक्षपदाचे उमेदवार ठरवले; महायुतीचा 'प्लॅन बी' तयार? मुंबई : महाराष्ट्रातील

फडणवीसांनी युतीचा पेच सोडवला! जागा वाटपावर मतभेद असले तरी 'पोस्ट पोल युती' निश्चित

फडणवीसांनी कोल्हापुरात सोडले उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र! कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची

पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्या ठार ; वनविभागाची कारवाई

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या

वर्धा शहरातील रामनगर येथील भूखंड मालकी हक्काने देण्यास मंजुरी

मुंबई : वर्धा नगरपरिषदेच्या मालकीचे रामनगरमधील भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने करून

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम कार्यक्रमासाठी ९५.३५ कोटींची तरतूद

मुंबई : शिख धर्माचे नववे गुरू आणि ‘हिंद-की-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी