Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरलग्नादिवशीच नवरदेवाच्या हातात बेड्या

लग्नादिवशीच नवरदेवाच्या हातात बेड्या

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; नवरी मुलीने केली तक्रार

वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यातील एका पाड्यावरील रहिवासी असलेल्या परेश (वय २१) याचे एका मुलीशी लग्न ठरले होते. मात्र या मुलाचे आणखी एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने लग्न ठरलेल्या मुलीने पोक्सोअंतर्गत वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने १८ मे या लग्नाच्या दिवशीच परेशला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

डिसेंबर २०२१ पासून या मुलीसोबत त्याचे संबंध असल्याने दोघांच्याही नातेवाईकांनी सर्वानुमते लग्न ठरवले होते. रितसर लग्नपत्रिका छापून १८ मे रोजी लग्न होणार होते. दरम्यान, या मुलीच्या मावशीच्या मुलाचे बारसे असल्याने दोघेही मावशीच्या घरी गेले असता. तिथे मावशीच्या मुलीशी ओळख झाल्याने तिच्यासोबत त्याने पळून जाऊन मंदिरात लग्न लावले.

हा प्रकार लग्न ठरलेल्या मुलीला व तिच्या नातेवाईकांना समजल्याने सदर मुलीने परेश याच्याविरोधात वाडा पोलीस ठाण्यात पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, वाडा पोलिसांनी परेशला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमनाथ ढोले करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -