मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई इंडियन्स संघातून खेळणारा युवा फलंदाज तिलक वर्माने दमदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याच्या या खेळीचे कौतुक महान माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केले आहे. ‘तिलकला क्रिकेटचे योग्य ज्ञान असून तो भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळू शकतो’, असे गावस्कर म्हणाले.
गावस्कर यांनी एका क्रीडा वाहीनीच्या शोमध्ये बोलताना तिलकचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, ‘तिलक वर्माने यंदाच्या हंगामात दिलासादायक अशी कामगिरी केली आहे.’
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात संघ अडचणीत असताना त्याने केलेली विजयी खेळी संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. ‘तिलक संपूर्ण मैदानात फटकेबाजी करू शकतो, स्ट्राइक रोटेट करण्याचं कसबही त्याच्यात आहे. त्यामुळे भविष्यात भारतासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो एक चांगला फलंदाज होऊ शकतो’, असेही गावस्कर म्हणाले.
बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…
लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…
नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…
दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…