आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बुस्टर डोसच्या कालावधीत कपात

मुंबई (प्रतिनिधी) : कोविड प्रतिबंधात्मक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या प्रौढ व्यक्तींना दुसरी मात्रा घेतल्यानंतर ९ महिन्यांनी प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येत आहे. मात्र आता आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना हा कालावधी ९ महिन्यांऐवजी ९० दिवस करण्यात आला आहे.


विविध कारणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास करणे गरजेचे असणाऱ्या व्यक्तींना या कालावधीत सवलत देण्यात यावी, अशी मागणी होत होती. या अनुषंगाने संबंधित तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार यात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या निर्णयानुसार ज्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय प्रवास करणे गरजेचे आहे आणि ज्या देशात त्यांना जायचे आहे, त्या देशातील नियमांनुसार प्रतिबंधात्मक मात्रा घेतलेली असणे गरजेचे आहे, अशा व्यक्तींना आता दुसरा डोस घेतल्यानंतर किमान ९० दिवसांनी तिसरा डोस घेता येणार आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कळविली असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.


दरम्यान वरील तपशिलानुसार ‘कोविन अॅप’मध्ये व संबंधित संगणकीय प्रणालीत आवश्यक ते बदल केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्तरावर करण्यात आले असल्याचेही पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

'बाल आधार' नोंदणीतील त्रुटींनी पालक त्रस्त

यूआयडीएआयकडे तातडीने उपाययोजनेची मागणी लहान मुलांच्या नवीन आधार नोंदणी प्रक्रियेत कागदपत्रांमधील

पोलीस स्टेशनच्या आवारात सोयीसुविधांसह ५५ हजार घरे बांधणार

प्रकल्पाचा अभ्यास व शिफारसीसाठी समिती स्थापन मुंबई  :  गणेशोत्सव असो नवरात्रोत्सव

मुंबईच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी झाडूंवर दीड कोटींचा खर्च!

मुंबई (प्रतिनिधी) :  स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाला झाडू खरेदीसाठी दरवर्षी दीड कोटी खर्च

अकरावीच्या प्रवेशासाठी ६ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

अजूनही राज्यात ८ लाख ३५ हजार जागा रिक्तच मुंबई (प्रतिनिधी) :  शाळांचे वर्ग सुरू होऊन तीन महिने

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल व सुधारणा कामांसाठी मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर विविध देखभाल, सिग्नलिंग आणि यार्ड रीमॉडेलिंगसाठी मेगाब्लॉक

पीएमजीपीच्या १७ अति धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा मुहूर्त निश्चित

डिसेंबरनंतर होणार कामांना सुरुवात मुंबई (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्ष रखडलेल्या अंधेरी (पूर्व)