माथेरान शटल सेवेसाठी लवकरच अतिरिक्त प्रवासी डबे

  132

नेरळ (वार्ताहर) : माथेरानच्या थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची माथेरान ते दस्तुरी नाका या मिनीट्रेनमधून प्रवास करण्याची इच्छा असते. त्यासाठी मिनीट्रेनच्या शटल सेवेच्या गाड्यांना अतिरिक्त प्रवासी डबे जोडण्याची मागणी करणारे निवेदन माथेरानकरांनी केले होते. दरम्यान, मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक शलभ गोएल यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शटल सेवेसाठी लवकरच अतिरिक्त डबे मिळणार आहेत.


माथेरानचे पर्यटन हे मिनी ट्रेनवर अवलंबून आहे. डब्यांची संख्या कमी असल्यामुळे शटलसेवेचा लाभ घेता येत नाही. त्याकरिता शटलसेवा ही आठ डब्यांची करावी तसेच शनिवार, रविवारप्रमाणे सोमवार ते शुक्रवार शटल सेवेच्या कमीतकमी दहा अप आणि दहा डाऊन अशा सेवा चालू करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावेत जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांची सोय होऊन रेल्वेच्या उत्पन्नात भर होणार आहे. नेरळ-माथेरान सिमेंटचे स्लीपर टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच ऑप्टिकल केबलचेही काम अंतिम टप्यात असून ऑनलाइन बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात नेरळ-माथेरान सेवा अखंडितपणे, जास्त फेऱ्या सुरू करण्याचे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच राज्य सरकार आणि नगर परिषद यांच्या सहकार्याने रेल महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्याचा आणि विविध उपक्रम राबविण्याचा मानस गोएल यांनी बोलून दाखविला.


माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत, विवेक चौधरी, माजी नगरसेवक प्रसाद सावंत, कुलदीप जाधव यांनी मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक शलभ गोएल यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी प्रेरणा सावंत यांचे निवेदन गोएल यांना देण्यात आले. यावेळी शटल सेवेच्या गाड्यांना अतिरिक्त प्रवासी डबे जोडण्याबाबत निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद दिला.


गोएल यांनी संबंधित विभागाला आदेश देऊन १६ मे ते २० मे दरम्यान शनिवार रविवारप्रमाणे दहा फेऱ्या सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. लवकरच मॅकेनिकल विभागाकडून आठ डब्यांची चाचणी घेऊन त्याचीही पूर्तता करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासित केले.

Comments
Add Comment

रायगड जिल्हा परिषदेच्या सात मतदारसंघांमध्ये वाढ

जिल्हा परिषद मतदारसंघाचे ६६ गट; पंचायत समित्यांचे १३२ गण अलिबाग : रायगड जिल्ह्यात रायगड जिल्हा परिषदेच्या सात

खारेपाट भागाला आजही गढूळ पाणीपुरवठा

साथीचे आजार पसरण्याची भीती पेण : पेण तालुक्याच्या खारेपाटातील अनेक गावांना, वाड्यांना नेहमीच पाणीटंचाईचा व

जिल्ह्यातील १ हजार १७२ शेतकरी विमा भरपाईच्या प्रतीक्षेत

बँक खात्याला आधार लिंक नसल्याचा शेतकऱ्यांना फटका अलिबाग : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या उभारी देण्यासाठी

जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागात मनुष्यबळाचा अभाव

कोट्यवधींचे परकीय चलन मिळवून देणाऱ्या मत्स्यविभागाकडे सरकारचे दुर्लक्ष अलिबाग : अलिबाग जवळच्या समुद्रात

प्रवीण ठाकूर यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

रायगडमध्ये काँग्रेसला मोठा झटका अलिबाग : स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या आगामी निवडणुकांच्या आधी राज्यात

मुरुडच्या काशिद समुद्रकिनारी पंचावन्न लाखाेंचा चरस जप्त

नांदगाव मुरुड : गुप्त बातमीदारामार्फत मुरुड पोलिसांना ३१ जुलै रोजी मिळालेल्या माहितीनुसार मुरुड तालुक्यातील