पुणे : थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी श्रीमती संजिवनी करंदीकर यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे दुःखद निधन झाले.
मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या त्या आत्या होत्या. किर्तीताई फाटक यांच्या त्या मातोश्री होत्या. रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये ३८ वर्षे मशीन सेक्शन अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते.