कर्जत (प्रतिनिधी) : मागील दहा वर्षांपासून ई रिक्षासाठी अविरतपणे लढा देत आज दि.१२ मे रोजी सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार माथेरानमध्ये ई रिक्षा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी ई रिक्षा श्रमिक संघटनेचे सचिव, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने संपूर्ण माथेरान मधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना देखील माथेरान सारख्या या सुंदर स्थळावर ब्रिटिश काळापासून आजही अमानुषपणे हातरीक्षाचा व्यवसाय सुरु आहे. या श्रमिकांना या अमानवीय प्रथेतून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी त्याचप्रमाणे चार ते पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेसाठी पायपीट करावी लागत आहे. या ठिकाणी दळणवळणाची सुविधा नसल्याने येथील स्थानिक मंडळी महागाईच्या झळा सोसत खूपच हलाखीचे जीवन जगत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी सुनील शिंदेंनी मागील दहा वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता.
ई रिक्षा सुरू करणे हे सर्वात मोठे आव्हान असताना देखील त्यांनी केवळ इथली भौगोलिक परिस्थिती बदलली पाहिजे. माणसाला माणसा सारखी वागणूक मिळाली पाहिजे. वाहतुकीची सोय नसल्याने इच्छा असून सुद्धा वयोवृद्ध पर्यटक येऊ शकत नाहीत याची खंत वाटत असल्यामुळे सुनील शिंदे यांनी दहा वर्षे आपला लढा अविरतपणे सुरू ठेवला त्याला यश मिळाले असून लवकरच हे सुंदर स्थळ ई रिक्षाच्या माध्यमातून जगाच्या बरोबरीने धावणार आहे.
खरोखरच ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. कारण स्थानिकांना आजवर अनेक संकटांना तोंड द्यावे लागत होते. पद्याभार स्वीकारल्यानंतर ई रिक्षाचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने विविध कार्यालयात जावे लागत होते. सुनील शिंदें यांनी काही मेहनत घेतली आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी असून हे गाव आगामी काळात नक्कीच यशाच्या शिखरावर जाणार यात शंका नाही. -सुरेखा भणगे (मुख्याधिकारी तथा प्रशासक माथेरान नगरपरिषद)
हातरिक्षा चालकांच्या दहा वर्षाच्या संघर्षाला अभूतपूर्व यश आले आहे. माथेरान करांसाठी हा आजचा सोन्याचा दिवस आहे. अमानवीय प्रथेतून मुक्ती रिक्षा संघटनेच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली न्यायाधीशांनी अशा प्रकारची व्यवस्था २१ व्या शतकात कशी सुरू राहू शकते असा जाब राज्य सरकारचे अटरणी जनरल वकील याना विचारला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश नुसार सनियंत्रण समितीला पायलट प्रोजेक्ट सुरू करायचा त्याला आज सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली तीन महिन्यानंतर रिपोर्ट कोर्टाला सादर करायचा आहे. माथेरानच्या जनतेचे आभार व अभिनंदन. – सुनिल शिंदे, (सामाजिक कार्यकर्ते माथेरान)
खऱ्या अर्थाने अभूतपूर्व निर्णय दळण वळणातील व पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय आहे. माणसाकडे चिकाटी असली की काय होते. हे पाहायला मिळाले. वेळ, पैसा, प्रसंगी विरोध आपल्या घरातील मधल्या काळातील आजारपण या सगळ्या गोष्टीवर आपण मात केली. आपणास ई रिक्षाचे जनक म्हंटले तर वावगे ठरणार नाही माथेरानकर आपले योगदान कधीच विसरणार नाही याची इतिहासात आपली नोंद राहील. -शिवाजी शिंदे, (माजी विरोधी पक्षनेते काँग्रेस)
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…