Thursday, July 18, 2024
Homeदेशभारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी राजीव कुमार यांची नियुक्ती

भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी राजीव कुमार यांची नियुक्ती

नवी दिल्ली : भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे १५ मे रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेतील. राजीव कुमार हे सुशील चंद्रा यांची जागा घेतील. १४ मे रोजी सुशील चंद्रा यांचा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण होईल. विधी मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी करत राजीव कुमार यांची नियुक्ती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केले असल्याचे सांगितले आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी देखील यासंदर्भात ट्वीट केले असून त्यांनी नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताचं अभिनंदन केले आहे.

राजीव कुमार यांनी २०२० साली निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यावेळी त्यांची अशोक लवासा यांच्या जागी नियुक्ती झाली होती. राजीव कुमार हे झारखंड कॅडरचे १९८४ बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. आता ते मुख्य निवडणूक आयुक्त झाले आहेत. ते २०२५ मध्ये सेवानिवृत्त होतील. २०२४ च्या लोकसभा निवडणुका देखील आता त्यांच्या नेतृत्वातच होतील.

निवडणूक आयुक्त पदासाठीचा कार्यकाळ हा सहा वर्षांसाठी असतो. किंवा वयाची अट ६५ वर्षांची असते.

राजीव कुमार यांचा जन्म १९६० सालचा आहे. राजीव कुमार यांनी ३६ हून अधिक वर्षे शासकीय सेवेत घालवली आहेत. त्यांनी केंद्र आणि बिहार-झारखंड राज्य कॅडरमध्ये विविध मंत्रालयाचे कामकाज सांभाळले आहे. ते २०२० साली केंद्रीय वित्त सचिव म्हणून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांची सार्वजनिक उद्यम चयन बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -