ठाणे (प्रतिनिधी) : खेळणी व्यापारी फैजल मेमन याच्या घरी धाड टाकून ३० कोटींच्या रकमेचे बॉक्स पोलीस ठाण्यात नेणाऱ्या मुंब्रा पोलिसांचे कनेक्शन उघड झाल्यानंतर बुधवारी ठाणे पोलीस आयुक्तालयातून मुंब्य्रातील ३ पोलीस अधिकारी व ७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंब्य्राच्या बॉम्बे कॉलनीत राहणारे खेळण्यांचे व्यापारी फैजल मेमन यांच्या घरी १२ एप्रिल रोजी मध्यरात्री मुंब्रा पोलिसांनी खोटी धाड टाकली. याबाबत इब्राहिम शेख याने ठाणे पोलीसआयुक्तालयासह गृहखात्याला पत्र लिहून माहिती दिली. खेळण्याच्या बॉक्समध्ये भरून आणलेली ही रक्कम तत्कालीन मुंब्रा पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) गीताराम शेवाळे, पोलीस निरीक्षक हर्षद काळे, रवीराज मदने, पो. ना. पंकज गायकर, दीपक किरपण, पो. शि. गावीत अशा १० कर्मचाऱ्यांनी छापेमारी केली होती. अखेर बुधवारी ३ पोलीस अधिकारी व ७ पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणी मुंब्य्राचे सध्याचे व. पो. नि. अशोक कडलक आणि सहा. आयुक्त व्यंकटेश आंधळे हे देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या दोघांची विभागीय चौकशी पोलीस उपायुक्तांमार्फत करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक परदेशी दौरे करतात. या दरम्यान ते…
आफ्रिकेच्या सर्वात मोठा तंत्रज्ञान आणि स्टार्टअप शो नवी दिल्ली : गिटेक्स या आफ्रिकेच्या सर्वात मोठ्या…
दिल्लीतल्या गाजलेल्या खटल्यावर आधारित नवीन वेब सिरीज नवी दिल्ली : अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री…
नाशिक : नाशिक - पुणे मार्गावरील काठे गल्ली सिग्नलजवळ असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई…
मुंबई : जेईई च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जेईई मेन सत्र २ची २ ते ८ एप्रिल…
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने केली कठोर कारवाई हैदराबाद : तब्बल १४ वर्षे जुन्या मनी लाँड्रिंग…