मुंबई : राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटून उठेल हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मला जीवे मारण्याच्या धमकीचे एक पत्र माझ्या लालबागच्या पक्ष कार्यालयात आले असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. याच पत्रासंदर्भात बाळा नांदगावकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे संबंधित पत्र सुपूर्द केले. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली.
“माझ्या लालबागच्या कार्यालयात काल एक धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यात मला आणि राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत मी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मी राज ठाकरेंना ते पत्र दाखवले व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून संबंधित पत्र त्यांच्याकडे दिले आहे. आता ते याबाबत चौकशी करतील. गृहमंत्र्यांनी तातडीने पोलीस आयुक्तांशी बोलून याचा तपास करण्याचे आश्वासन मला दिले आहे. पण एक सांगतो. मला दिलेली धमकी एक वेळ ठीक. पण राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटून उठेल हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे”, असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.
अजान संदर्भात तुम्ही सुरू केलेले आंदोलन थांबवा नाहीतर तुम्हाला तर जीवानिशी मारूच पण तुमच्या राज ठाकरेंचाही जीव घेऊ, अशी धमकी पत्रातून देण्यात आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. पत्र हिंदी भाषेत असून यात काही ऊर्दू ओळींचाही समावेश असल्याचे नांदगावकर म्हणाले. पत्र राज्य सरकारकडे सुपूर्द केले आहे. आता ते त्याची चौकशी करतील अशी आशा आम्हाला आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशीही मागणी यावेळी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…