वांद्र्यात बिल्डरच्या घशात भूखंड घालून ३ हजार कोटींचा घोटाळा

मुंबई (प्रतिनिधी) : वांद्रे पश्चिम बॅन्डस्टँड परिसरातील ताज हॉटेल शेजारी असणाऱ्या सरकारी मालकीचा भूखंड बिल्डरच्या घशात घालून सुमारे तीन हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या पंचतारांकित जागेवर “एसआरए” योजना दाखवून एसआरए योजनेतील लाभ व एफएसआय बिल्डरला देण्यात येणार असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केला.


आशीष शेलार यांनी ५ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन हा भूखंड घोटाळा उघड केला होता. त्यावेळी त्यांनी या प्रकरणात १ हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. त्याबाबत खुलासा उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी करून यामध्ये कोणत्याही प्रकारे घोटाळा झाला नसल्याचे प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. त्या खुलाशाला आज उत्तर देणार नाही, योग्य वेळी आपण त्यावर बोलू असे सांगत आमदार अॅड. आशीष शेलार यांनी मंगळवारी पुन्हा दादर वसंत स्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याच घोटाळ्यातील आणखी एक गंभीर बाब उघड करून नवीन आरोप केले आहेत.


आशीष शेलार म्हणाले की, या भूखंडावर १६८ कायमस्वरूपी संक्रमण शिबिरातील घरे बिल्डर बांधून देणार, असे दाखवून या मोकळ्या भूखंडावर एसआरए योजना राबविण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे संक्रमण शिबिराच्या नावाखाली विकासकाला एसआरए योजनेचे फायदा देण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस