राज ठाकरेंना अल्टीमेटम

नंदिनीनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५ जुनच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या नेतृत्वात जोरदार विरोध होत आहे. उत्तर प्रदेशमधील नंदिनी नगर येथे आयोजित सभेत महंतांनी राज ठाकरे यांना एका आठवड्यात माफी मागा, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी धमकी दिली आहे. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली.


यावेळी बृजभूषण यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत म्हटले आहे की, राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांवर केलेला अत्याचार आम्ही विसरणार नाही. साधूसंतांनी राज ठाकरेंना माफ केले तरच राज यांना अयोध्येत प्रवेश देण्याबद्दल विचार करू. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. साधूसंत आणि अयोध्यावासी राज ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी.


बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे की, आधी उत्तर भारतीयांवर अन्याय करायचा आणि नंतर अचानक राम भक्त बनायचे, हे जनतेच्याही लक्षात येत आहे. अयोध्येतील जनता राज ठाकरेंवर नाराज आहे. साधूसंतांनी राज ठाकरेंवर रोष व्यक्त केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अयोध्येत राज ठाकरे यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार सिंह यांनी आज त्यासाठी बैठक बोलावली. नंदिनीनगर इथे साधुसंत आणि नागरिकांसोबत त्यांनी बैठक घेतली.


राज ठाकरेंनी ५ जूनला अयोध्येत जाण्याचे जाहीर केले आहे. मनसेने या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. तर उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे.

Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१