कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात; तिघे गंभीर

नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव-औरंगाबाद रोडवर ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. यात ट्रक पलटी झाल्याने झालेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत, तर २४हून अधिक कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. डॉक्टरवाडी शिवारात काल रात्री ही घटना घडली. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचादेखील समावेश आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिमाशंकर येथून ट्रक क्र. एम. एच. १४ सि. यू. २०५ हा कारखान्यावरून ऊस तोडणी मजुरांना चाळीसगाव तालुक्यातील बोढरे तांडा येथील घरी पोहोचवण्यासाठी निघालेला असताना नांदगाव-औरंगाबाद रस्त्यावरील डॉक्टरवाडी शिवारात चालक प्रदीप प्रकाश चव्हाण याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात अनिल चव्हाण, विश्वानाथ गिते व विलास वाघ हे गंभीर जखमी झाले असून त्यांना धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नांदगाव ग्रामीण रुग्णालयात रेणुका तांबे, प्रवीण पवार, ललीत चव्हाण, प्रकाश चव्हाण, सावली चव्हाण, सरला चव्हाण, पुनम चव्हाण, शैली चव्हाण, जयश्री चव्हाण, योगेश चव्हाण, राजाराम चव्हाण, चंद्रकला चव्हाण, सुवर्णा चव्हाण, बैनशी चव्हाण, काजल चव्हाण, भाग्यश्री चव्हाण, गोकुळ चव्हाण, लता चव्हाण, सौरभ चव्हाण, तुळशीराम चव्हाण, अमेदी चव्हाण सर्व रा. (बोढरे ता. चाळीसगाव) हे ऊसतोड कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका तसेच पोलिसांच्या वाहनातून जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.


जखमींवर तातडीने नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे, मालेगाव, चाळीसगाव येथे पाठवण्यात आले. जखमींची संख्या जास्त असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांसह परिसरातील खासगी डॉक्टरांनीदेखील यावेळी अपघातातील जखमींवर उपचार करत मदतीसाठी धावून आले. याप्रकरणी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भूषण अहिरे अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

तुमच्या खिशातली ५००ची नोट खरी आहे की नकली? हा धक्कादायक प्रकार ऐकून पायाखालची जमीनच सरकेल!

अमरावती: सावधान! तुमच्या हातात येणारी प्रत्येक ५०० रुपयांची नोट खरी आहे की, बनावट? कारण, अमरावती जिल्ह्यात बनावट

पुणे एसटी विभागाची दिवाळी दरम्यान कोटींची कमाई! सणानिमित्त सोडल्या होत्या जादा बस

पुणे: यावर्षी दिवाळीला गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी पुणे एसटी विभागातून दि. १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान जादा बस

सावधान! चेहऱ्याला दररोज क्रीम लावताय? फेअरनेस क्रीममुळे महाराष्ट्रातील तीन महिलांची किडनी निकामी

मुंबई: चेहरा गोरा आणि सुंदर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही 'स्किन लाईटनिंग क्रीम्स' आरोग्यासाठी किती

हिट अँड रन, भरधाव बोलेरोने दोन तरुणींना उडवले

अमरावती : महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 'हिट अँड रन'ची घटना घडली. भरधाव

‘मजबुरी’चे दुसरे नाव ‘ठाकरे परिवार’ आणि बच्चू कडू म्हणजे ‘नौटंकी’

तुमची संपत्ती मला द्या, माजी खासदार नवनीत राणा यांचे खुले आव्हान अमरावती : माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रहार

Akola News : पाडव्याआधीच 'काळाचा घाला'! ऐन दिवाळीत भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघे ठार; अकोल्यात शोककळा

अकोला : संपूर्ण राज्यासह देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह ओसंडून वाहत असताना, अकोल्यात मात्र लक्ष्मीपूजनाच्या