डहाणूच्या समुद्रात १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

बोईसर (वार्ताहर) : डहाणूजवळील नरपड येथील समुद्रात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या ओम किशोर म्हात्रे (वय १३) या मुलाचा बुडून मृत्यू झाला. डहाणू पोलिसांनी तटरक्षक दलाच्या मदतीने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोधमोहीम राबवून त्याचा मृतदेह शोधण्यात यश मिळवले.


ओम हा डहाणूच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होता. उन्हाळी सुट्टी असल्यामुळे ओम शुक्रवारी दुपारी चार मित्रांसह जवळील समुद्रात पोहण्यासाठी गेला होता. बराच वेळ होऊनही ओम घरी न परतल्याने त्याचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केल्यावर ओम हा समुद्रात बुडाला आहे असे त्याच्यासोबत असलेल्या घाबरलेल्या मित्रांनी रात्री उशिरा सांगितले.


ओमला शोधण्याची मोहीम दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी डहाणू पोलीस स्टेशनचे निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, जीवरक्षक, स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांच्या मदतीने सुरू केली. मात्र समुद्राला ओहोटी असल्याने शोधमोहिमेत अडथळे येत होते. दुपारी पुन्हा भरती सुरू झाल्यावर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोध सुरू केला असता संध्याकाळच्या सुमारास डहाणू आगर किनाऱ्याजवळ ओमचा मृतदेह सापडला.

Comments
Add Comment

महापालिका प्रशासन लागले निवडणुकीच्या कामाला

विरार : महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिका प्रशासन निवडणूक

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहनांना तीन दिवस बंदी

घोडबंदर मार्गावरील दुरुस्तीसाठी बदल पालघर : ठाणे - घोडबंदर मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीचे नियोजन न

एकाच वेळी संसदेत मांडली तीन विधेयक

खासदार डॉ. हेमंत सवरा यांना यश पालघर : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाशी निगडित तीन महत्त्वपूर्ण विधयके

न्याय मागणाऱ्या महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार

आरोपी हवालदारास अटक डहाणू : आपल्या पतीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेशी जवळीक साधून तिच्यावर

नगर परिषदेच्या निकालापूर्वीच महापालिकेसाठी मनोमिलन

वसई-विरारमध्ये महायुती एकत्र लढण्याचे संकेत गणेश पाटील विरार : पालघर जिल्ह्यात नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद

ग्रामीण भागातही ३० हजार दुबार मतदार

जिल्हा परिषदेच्या ५७ गटातील मतदारांचा समावेश पालघर : मतदार याद्यांमधील दुबार नावावरून सर्वत्र राजकीय वातावरण