मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यांना माध्यमांसोबत बोलण्यास बंदी घातली होती. तरीही त्यांनी माध्यमांसोबत बोलून अटींचे उल्लंघन केले आहे, असा आरोप मुंबई पोलिसांनी कोर्टात केला होता. असाच युक्तीवाद सरकारी वकिलांनी आज न्यायालयात केला. न्यायालयाने आता राणा दाम्पत्यांना तुमच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये? अशी नोटीस बजावली आहे.
राणा दाम्पत्यांनी त्यांच्या वक्तव्याने जामीन अटींचे उल्लंघन केले असून जामीन आदेशानुसार त्यांचा जामीन रद्द करण्यात आला आहे. या जोडप्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, असे पोलिस आणि सरकारी वकिलांनी म्हटले आहे. त्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्यांना अटक होईल का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…