‘एनएमएमटी’मधील स्टॉपची बटण सिस्टीम अखेर ‘स्टॉप’

नवी मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक शहराला सजेशा बसेसमध्ये बसेसची बांधणी करणाऱ्या कंपनीने स्टॉपची बटणे निर्माण केली. यामागे प्रचलित घंटीचा वापर करू नये. या प्रकरचा संकेत दिला गेला होता; परंतु बसेसमध्ये बसविण्यात आलेल्या बटणावर प्रवाशी विद्यार्थी व लहानग्यांनी त्याचा वापर मजेसाठी केल्यामुळे चालकाची डोकेदुखी वाढली. म्हणून यावर प्रतिबंध यावा म्हणून कार्यान्वित केलेली बटन सिस्टीम बंद करण्याची वेळ मनपा परिवहन उपक्रमावर आली आहे.


मनपाच्या परिवहन उपक्रमात पाचशेपेक्षा जास्त विविध प्रकारच्या बसेस आहेत; परंतु यातील नव्याने आलेल्या पर्यावरणपूरक वातानुकूलित बसेस व काही साध्या बसेसमध्ये घंटी विरहित बस सेवा मिळावी. म्हणून बसेसमध्ये असणाऱ्या लोखंडी रॉडवर स्टॉप नावाचे बटन लावून त्याद्वारे बसेसचे मार्गक्रमण चालावे हा उद्देश होता. पण त्याचा दुरुपयोग सुरू झाल्याने उपक्रमाला आधुनिक स्टॉप सिस्टीम बंद करण्याची परिस्थिती ओढवली आहे.


बस सेवा सुरू झाल्यावर यापूर्वी सुतळीचा वापर करून घंटी त्याला बांधली जात होती. त्याद्वारे एक घंटी वाजली की बस थांबविली जात असे. तर दोन घंटी वाजल्यावर बस पळवण्याचे संकेत होते. यामुळे वाहकाला सुतळीपर्यंत जावे लागत होते; परंतु नव्याने यंत्रणा वापरून स्टॉपचे बटन आगदी कंबरेच्या उंचीवर होते. तसेच बसेसमधील सर्वच प्रवाशांना आधारासाठी उभारलेल्या रॉड वर असल्याने वाहक सहज थांबा आल्यावर स्टॉपचे बटन दाबून बस थांबवून बस थांबवण्याचा इशारा चालकाला करत असे; परंतु विद्यार्थ्यांच्या मस्तीमुळे स्टॉपच्या बटणावर पाणी फेरले गेले आहे.


बसेसमध्ये स्टॉपचे बटन हाताशी असल्याने लहानग्यांना मजा येत असे. बटन दाबल्यावर टुकटुक आवाजाने विद्यार्थी आनंदित होत बटन दाबण्याचा सिलसिला नेहमीच चालला होता. त्यामुळे मनस्ताप होत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.


स्टॉपचे बटन का बंद केले आहे, याची माहिती घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल. - अनिल शिंदे, वाहतूक अधीक्षक, परिवहन उपक्रम.

Comments
Add Comment

i Phone 17 Pro साठी फ्रीस्टाइल हाणामारी, BKC मध्ये राडा

i Phone 17 Pro: अॅपलचे बहुप्रतीक्षित आयफोन १७, आयफोन १७ प्रो, आयफोन १७ प्रो मॅक्स आणि आयफोन एअरच्या विक्रीला आजपासून

'म्हाडासाथी' एआय चॅटबॉटचे लोकार्पण, म्हाडाचे आणखी एक तंत्रस्नेही पाऊल

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) एक लोकाभिमुख संस्था असून

यंदाच्या गणेशोत्सवात लाल परीने मोडले सर्व विक्रम...केलं असं काही की...

५ हजार जादा एसटी बसमधून सहा लाख कोकणवासीयांचा प्रवास गणेशोत्सवात

तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ही हे आधी वाचा...नाहीतर मिळणार नाहीत पैसे

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या योजनेतील

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन