राणांना डिस्चार्ज मिळताच किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे लिलावतीत

मुंबई : खासदार नवनीत राणा गेल्या काही दिवसांपासून लिलावती रुग्णालयात उपचार घेत होत्या. यावेळी त्यांचे रुग्णालयातले काही फोटो व्हायरल होत होते. त्यांचा एमआरआय मशीनमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवर आक्षेप घेत आता शिवसेना आक्रमक झाली आहे. यावरून किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयाला धारेवर धरले आहे.


याप्रकरणी शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला आहे. नवनीत राणा स्पाँडिलायसिसचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांचा एमआरआय काढण्यात आला. यावेळी एमआरआय काढत असतानाचे त्यांचे काही फोटो प्रसिद्ध झाले होते. यावरूनच पेडणेकर यांनी आक्षेप घेतला आहे. नवनीत राणांचा एमआरआय नक्की झाला की नाही? झाला असेल तर रुग्णालय प्रशासनाने त्याला अहवाल सादर करावा. एमआरआय रुममध्ये रुग्णासोबत एकाच व्यक्तीला परवानगी असताना राणांसोबत चार लोक कसे गेले. सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ मला द्या, अशी मागणीही पेडणेकर यांनी केली आहे.


राणांना रुग्णालयात शूटिंगची परवानगी कशी देण्यात आली, असा सवालही मनिषा कायंदे यांनी रुग्णालय प्रशासनाला केला आहे. त्याचबरोबर स्पाँडिलायसिस असताना नवनीत राणांनी उशी कशी काय वापरली, असा प्रश्नही पेडणेकरांनी उपस्थित केला आहे.


दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे तसेच दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.