मुंबई (प्रतिनिधी) : राज्यभरातील शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांचे वेतन एकाच दिवशी होत नसल्यामुळे वेतनाचा योग्य गणित बसत नसल्याच्या अनेक तक्रारी वेळोवेळी समोर आल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक शिक्षकांना आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वेतन मिळत नसल्याची माहिती देखील अनेकवेळा पुढे येते. त्यामुळे या सर्व अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आणि शिक्षकांचा पगार महिन्याच्या पहिल्या तारखेलाच होण्यासाठी शिक्षण विभागाकडून लवकरच जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टम (झेडपीएफएमएस) प्रणालीचा वापर केला जाणार आहे. या प्रणालीमुळे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्या दिवशीच वेतन मिळणार आहे. यासाठी शालेय शिक्षण आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत.
राज्यातील अनुदानित शाळेतील शिक्षकांचे वेतन वेळेत होत नसल्यामुळे संघटनांकडून अनेकवेळा आंदोलन, निवेदन देण्यात येतात. मात्र वेतन वेळेत मिळत नसल्याची तक्रार गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने वित्त विभागाच्या प्रधान सचिवांसोबत बैठक घेऊन त्यात हे वेतन वेळेत देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी सर्व शिक्षण उपसंचालक, वेतन अधिक्षक, शिक्षण निरीक्षक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षकांचे वेतन वेळेत देण्याचे आदेश दिले आहेत. त्यात शिक्षकांचे नियमित मासिक वेतन देयक हे दरमहा ७ तारखेपर्यंत वेतन पथकांकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या शिक्षक आणि शिक्षकेतरांचे वेतन हे शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून सादर केले जाते, त्यासाठी शालार्थच्या वेळापत्रकानुसार अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून संघटनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या या मागणीची दखल घेत त्यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी झेडपीएफएमएस प्रणाली तयार करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार असून त्यासाठीची कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…