Thursday, December 12, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यठाकर आदिवासींचा सांस्कृतिक ठेवा

ठाकर आदिवासींचा सांस्कृतिक ठेवा

प्रा. रश्मी शेट्ये – तुपे

पिंगुळी, स्वातंत्र्यपूर्व काळातील सावंतवाडी संस्थानातील एक गाव. पिंगळा पक्ष्याचा हुबेहूब आवाज काढण्यावरून हे लोक पिंगळा म्हणून तर त्यांच्या वास्तव्यामुळे हे गाव पिंगुळी म्हणून प्रसिद्ध ओळखले जाऊ लागले. कळसूत्री बाहुल्या, चामड्याच्या बाहुल्या, चित्रकथी, पोतराजा, नंदीबैल अशा लोककला सादर करून आपली उपजीविका करू लागले. या ठाकर आदिवासी लोकांची स्वतःची अशी एक संस्कृती आहे. ठाकरांच्या अनेक पिढ्यांनी ती जोपासली. त्यांच्या या कलाप्रकारांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि कारवार प्रांतात आपल्या कला सादर करून इथल्या लोकांचे शेकडो वर्षे मनोरंजन केले.

स्वतंत्र भारतात शिक्षणाचा प्रसार झाला आणि सारेच कलाप्रकार नामशेष झाले. नव्या पिढीचा लोककला विषयीचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांचा ऱ्हास अटळ ठरला. मात्र काही अंशी जुने जाणते लोककलावंत या कलांची आजही जोपासना करीत आहेत. अशावेळी या कलांचा मागोवा घेत त्यावर पुस्तक लिहून लेखक रामचंद्र वरक यांनी सांस्कृतिक ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने मोलाचे पाऊल उचलले आहे. पिंगुळीच्या ठाकर आदिवासींच्या सांस्कृतिक जीवनाचा एका व्यासंगी लेखकाने घेतलेला हा मागोवा आहे. लोककलांचे संशोधक, कवी अशोक परांजपे, अभ्यासक

कै. प्रा. डॉ. रमेश कुबल, प्रा. डॉ. पुष्पलता राजापुरे-तापस आदींच्या मार्गदर्शनातून लेखकाची लोककलाविषयक दृष्टी समृद्ध होत गेली. ‘धनगरगाथा’, ‘दशावतारी नाट्यसंहिता’, असे वेगळ्या धाटणीचे साहित्यही लेखकाकडून लिहिले गेले आहे. या पुस्तकातून सांस्कृतिक ठेवा जतन केला गेल्याचे दिसून येते.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -