आयआयटी मुंबईच्या अॅपवर हवामानाचे अंदाज

  52

मुंबई (प्रतिनिधी) : शेतकरी किंवा मासेमारी करणाऱ्या नागरिकांसाठी हवामानाची अचूक माहिती असणे खूप गरजेचे असते, या हवामानाच्या अंदाजामुळे त्यांना पुढील निर्णय घेण्यास सोपे जातात. त्यामुळे नागरिकांना हवामानाची माहिती मिळावी म्हणून आयआयटी मुंबई एक ऍप उपलब्ध करुन देणार आहे.


या नवीन उपक्रमासाठी आयआयटी मुंबईने भू विज्ञान मंत्रालयाशीही सहकार्य करार केला असून, याद्वारेही हवामान बदलासंदर्भात संशोधन केले जाणार आहे. या नविन उपक्रमामुळे नागरिकांना त्वरित त्यांच्या मोबाईलवर हवामानाची स्थिती समजनार आहे.


देशाला सन २०७०पर्यंत 'शून्य उत्सर्जना'चे उद्दिष्ट्य साध्य करायचे आहे. या प्रवासात आयआयटी मुंबई तंत्रज्ञानावर आधारित सुविधा घेऊन सहभागी होणार आहे. यासाठी दहा वर्षांपूर्वी आयआयटीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या 'सेंटर फॉर एक्सलन्स इन क्लायमेट सर्व्हिसेस'च्या माध्यमातून विशेष पावले उचलली जाणार आहेत.


संबंधित अॅपचा फायदा देशातील शहरी तसेच ग्रामीण भागांतील विविध वापरकर्त्यांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर या सहकार्यामधून सेन्सॉर्स, ड्रोन आधारीत स्मार्ट मॉनिटरिंग प्रणाली, स्मार्ट अॅग्रीकल्चर तंत्रज्ञान, स्वयंचलित पूर्वसूचना प्रणाली, आरोग्य आणि हवामान, स्मार्ट पॉवरग्रिड व्यवस्थापन, उष्णतेच्या लाटेचा अंदाज अशा विविध बाबींवर संशोधन होणार आहे.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री