Monday, December 2, 2024
Homeमहत्वाची बातमीभोंगे उतरत नाही तोपर्यंत मनसेचे आंदोलन सुरुच राहणार

भोंगे उतरत नाही तोपर्यंत मनसेचे आंदोलन सुरुच राहणार

राज ठाकरेंची परखड भूमिका

आमच्या सणांना १०-१२ दिवसांची परवानगी, त्यांना ३६५ दिवसांची कशासाठी देता?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात त्यांची भूमिका अशीच आक्रमक राहाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की जोपर्यंत मशिदींवर भोंग्यातून अजान दिली जाईल, तोपर्यंत त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागणार. हा विषय फक्त आजपूरता नाही तर जोपर्यंत यावर निर्णय येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मशिदीवरील भोंग्यांसदर्भातील आंदोलनाबाबत भूमिका माडंली. यावेळी मशिदीवरील भोंगे हा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मशिदींना परवानगी दिल्याचे सांगितले. तुम्ही मशिदींना ३६५ दिवसांची परवानगी कशी देता. आम्हाला दिवसाची परवानगी देता. आमच्या सणांना १०-१२ दिवसांची परवानगी देता, मग मशिदींना ३६५ दिवसांची परवानगी कशी देता, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. मशिदींना दररोज परवानगी घ्यायला लावा, असे राज ठाकरे म्हणाले.

आताची पत्रकार परिषद ही ६ वाजता जाहीर केली होती. काही सूचना आता जाण्याची गरज असल्याने मी आता पत्रकार परिषद सुरु केली आहे. महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरुन याचे फोन येत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना पोलीस नोटीस पाठवत आहेत, त्यांना ताब्यात घेत आहेत. ही गोष्ट आमच्याबाबत का होते आहे, जे कायद्याचे पालन करत नाहीत, त्यांना ताब्यात घेतले जात नाही.

महाराष्ट्रात ९० ते ९२ टक्के महाराष्ट्रात सकाळची अजान झाली नाही. सर्व ठिकाणी आमचे लोक तयार होते. मी त्या मशिदींमध्ये मौलवी आणि जे कोण असतील त्यांचे आभार मानतो, आमचा जो विषय आहे त्यांना समजला आहे. मला मुंबईचा रिपोर्ट आला आहे, ११४० मशिदी आहेत, त्यापैकी १३५ ठिकाणी सकाळची अजान लावण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील यांचा फोन आला होता, त्यांनी सकाळची अजान होणार नाही, असे सांगितले होते. मात्र, १३५ मशिदींवर आता काय कारवाई करणार, का फक्त आमच्या लोकांना उचलणार आहात, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

आम्ही हा विषय मांडला, मशिदींना हा विषय समजला, पोलिसांना, सरकारला आणि पत्रकारांना धन्यवाद देईन. लोकांना दिवसभर जो त्रास होतो तो कमी होईल, अशी अपेक्षा आहे. हा विषय फक्त मशिदींचा नाही, मंदिरावर जे भोंगे आहेत ते देखील खाली आले पाहिजेत, असे राज ठाकरे म्हणाले.

राज्यात अनेक मशिदी अनधिकृत आहेत. सरकार त्यांना अधिकृत परवाने कशासाठी, कोणासाठी देत आहेत. माझा विषय हा सकाळच्या अजानपुरताविषय नाही, आम्ही दिवसभर चार ते पाच वेळा वाजवण्यात येणाऱ्या अजान विरोधात आहोत. विश्वास नांगरे पाटलांनी जे सांगितले की आम्ही परवानगी दिलीये, तुम्ही ३६५ दिवसांची परवानगी कशी देता, आम्हाला दिवसाची परवानगी देता. सणांना १०-१२ दिवसांची परवानगी देता. यांना ३६५ दिवसांची देणार, कशासाठी? यांनीही रोजच्या रोज परवानगी मागितली पाहिजे. आम्हाला दिवसाची परवानगी देतात, तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे दररोज परवानगी मागितली पाहिजे. आम्ही पहिल्यांदा भोंगे खाली उतरवा असे सांगितले होते. पोलिसांना डेसिबल मोजण्याचे काम आहे का? अनधिकृत भोंगे उतरवले जाणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे. जोपर्यंत हा विषय संपत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाने सांगितले त्या मर्यादेत अजान होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरु राहणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

हा विषय एक दिवसाचा नाही. मनसे कार्यकर्ते आणि हिंदूना आवाहन आहे की जोपर्यंत भोंगे उतरवले जाणार नाहीत तोपर्यंत हनुमान चालिसा दुप्पट आवाजात सुरु ठेवणार आहोत. १३५ मशिदींवर पोलीस काय करणार आहे ते पाहणार आहोत, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. माणुसकीपेक्षा हे लोक त्यांचा धर्म मोठा समजतात का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. सकाळी ज्यांनी अजान भोंग्यावर लावला नाही त्यांनी दिवसा देखील भोंग्यावर अजान लावू नये, असे राज ठाकरे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -