पुणे (वृत्तसंस्था) : हर्षल पटेलने आयपीएलच्या गेल्या हंगामात कमालीची गोलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. एवढ्या मोठ्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे.
सुरुवातीच्या काळात त्याने यूएसमधील न्यू जर्सी येथे एका पाकिस्तानी परफ्यूम विक्रेत्याच्या दुकानात रोजंदारीवर काम केले आहे. एका कार्यक्रमात हर्षलने स्वत: ही बाब सांगितली आहे. या कार्यक्रमात भाग घेत हर्षल पटेलने त्याची जडणघडण आणि क्रिकेटपटू होण्यासाठी त्याने घेतलेले कष्ट याविषयी सांगितले.
यावेळी बोलताना त्याने परफ्यूमच्या दुकानात कशा प्रकारे रोजंदारीने काम केले होते, याबद्दल सविस्तर माहिती दिली. “यूएसमधील न्यू जर्सी येथे मी एका पाकिस्तानी परफ्यूम विक्रेत्याच्या दुकानात रोजंदारीने काम करायचो. त्यावेळी दिवसभर काम केल्यानंतर मला ३५ डॉलर मिळायचे,” असे हर्षल पटेलने सांगितले.