मुंबई : जर ते मनसेला भाजपचे उपवस्त्र म्हणत असतील. तर मग शिवसेना काय फाटकी बनियन आहे का? मुंबईच्या भ्रष्टाचारातून तुमची फाटली, हिंदुत्वावरून तुम्ही फाटले, मंदिराच्या बाबतीत बोटचेपी भूमिका घेऊन तुम्ही फाटलात. आता मशिदीवरील भोंगे उतरवताना तुम्ही फाटले. शिवसेनेला फाटकी बनियन म्हणायचे का, असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
आम्ही बाळासाहेबांसाठी अनुशासन पाळले, संयम ठेवला. संजय राऊतांसाठी अनुशासन पाळणार नाही. तुम्ही, सरकारसाठी पलटी मारली. बेडूकउड्या मारणाऱ्या शिवसेनेचे संजय राऊत नवे नेतृत्त्व आहे. देव, देश धर्म गेला कुठे. पहिले मंदिर नंतर सरकार गेले कुठे, असा सवाल भाजप नेते आशिष शेलारांनी उपस्थित केला.
शिवसेनेचा आजचा कार्यक्रम आयत्या बिळावर नागोबा आहे. कुठेही काही झालं की आमच्यामुळेच झालं. ते युवराजांपासून ते विश्वविख्यात प्रवक्त्यांपर्यंत सगळ्यांचे तेच धंदे आहेत. शिवसेना ही बाबरी मशीद प्रकरणात अदखलपात्र आहे.